डोंबिवली: डोंबिवली रेप केस प्रकरण : डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीवर तब्बल 33 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेने डोंबिवलीसह ठाणे जिल्हा हादरला. दरम्यान ७२ तासानंतर डोंबिवली येथे घडलेल्या प्रकरणातील पीडितेला कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या तीन दिवसांत ज्या चाचण्या करणे गरजेचे होते त्या चाचण्या करून मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
आरोपींची संख्या पाहता डोंबिवलीतील महाराष्ट्रातील सामूहिक बलात्काराची ही पहिलीच घटना मानली जाते. पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. अटक आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन तरुणांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. तर यातील अन्य 10 जण अद्याप हाती लागले नसून पोलिस त्यांचाही कसोशीने शोध घेत आहेत.
डोंबिवली रेप केस प्रकरण : पोलिसही काही वेळ निश:ब्द
सातत्याने होणाऱ्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या या मुलीने तिच्या घरच्यांसह बुधवारी रात्री मानपाडा पोलिस ठाणे गाठले आणि आपल्यावर सुरू असलेल्या अत्याचारांची कैफियत मांडली. या मुलीने स्वतःवर झालेल्या अत्याचारांचा पाढाच वाचल्यानंतर पोलिसही काही वेळ निश:ब्द झाले होते.