पटणा: बिहारमधील एका महिला आयपीएसच्या अल्पवयीन मुलीवर नोकरांनेच अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. १० वर्षीय मुलीने त्याला विरोध केल्यानंतर तो तिच्या खोलीतून बाहेर पडला. मात्र, मुलीने तिची आई घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बच्चा कुमार असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
संबधित नोकर गेली बरीच वर्षे स्वयंपाकी म्हणून काम करत आहे. संबधित मुलगी त्याच्या पुढ्यात लहानाची मोठी झाली आहे. त्याच्यावर संबधित अधिकाऱ्याचा विश्वास होता. तरीही त्याने असे कृत्य केल्याने अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबधित १० वर्षीय मुलगी एकटी होती.
त्यावेळी स्वयंपाकी ही संधी साधून ५० वर्षीय आरोपी मुलीच्या खोलीत आला आणि खोलीचे दार आतून बंद केले.
यानंतर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला प्रचंड विरोध केल्यावर तो तेथून निघून गेला.
मुलीला शांत करण्याच्या उद्देशाने त्याने २०० रुपयांचे मोठे चॉकलेट दिले.
यानंतर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला प्रचंड विरोध केल्यावर तो तेथून निघून गेला.
मुलीला शांत करण्याच्या उद्देशाने त्याने २०० रुपयांचे मोठे चॉकलेट दिले.
पीडित मुलीला संशयिताने असे कृत्य केल्याने संबधित मुलीने आई घरी आल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला.
या प्रकाराचा महिला आयपीएस अधिकाऱ्याला धक्का बसला. त्यांनी तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात कळवून गुन्हा दाखल केला.
बच्चा कुमार याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
आरोपी संबधित आयपीएस अधिकाऱ्याचा जुना स्वयंपाकी आहे. या मुलीचा जन्मही त्याच्या समोरच झाला.
आरोपीने मुलीला लहानपणी मांडीवर बसवून भरवले होते. पण, आता तिच्यासोबत अशी गोष्ट केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
कुटुंबीयांनाही धक्का
महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या बाबतीत अशी घटना घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. संबधित नोकर हा अतिशय विश्वासू होता, तरीही त्याने असे कृत्य केल्याने अधिकाऱ्याच्या कुटुंबीय स्तब्ध झाले. संबधित मुलगी अजूनही धक्क्यात असल्याने तिचे समुदेशन करण्याची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले.