तेल्हारा (प्रा विकास दामोदर)- तेल्हारा पोलीस स्टेशन पासूनच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अवैध वरली हब चे तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात जाळे पसरलेले आहे याआधी पोलीस अधीक्षक विशेष पथक प्रमुख विलास पाटील यानि हब वर धाड टाकलेली होती.
सदर हब अकोल्यातील अधिकाऱ्यांना दिसते पण जवळच असलेल्या तेल्हारा पोलीस स्टेशनला दिसत नाही का ही एक आश्चर्याची बाब दिसून येते.याआधी वृत्तपत्रात वरली संदर्भात बातमी आली कि तात्पुरत्या स्वरूपात वरली बंद होते पण लगेचच दोन दिवसानंतर जैशे थे वरली खायवाडी करणारेच सांगतात कि आमचं नेटवर्क खूप मोठं आहे आम्ही पैशांचं तास लावलं आहे त्यामुळे आमचं कोणीही काही एक वाकडं करू शकत नाही आणि त्यांच्या या म्हणण्याला पुष्टी म्हणून राजरोस चिट्ठीवर वरली मांडताना दिसून येतात अशा या अवैध धंद्यास नेमके अभय कुणाचे अशी जण माणसात चर्चा सुरु आहे.
मागील काही दिवसापासून तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कित्येक मर्डर केस, चोरीच्या घटना, अवैध दारू व मटका एवढेच नव्हे तर दि.9/8/2021 रोजी भरदिवसा तेल्हारा शहरातील टॉवर चौकातून पैशांची बॅग लंपास करण्यात आली यावरून तेल्हारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गावोगावच्या काही सुज्ञ नागरिकांकडून पोलीस स्टेशनला अवैध धंदे बंद करणेबाबत वारंवार निवेदन देण्यात येत आहेत परंतु त्याचा काही एक फायदा होताना दिसत नाही पोलीस निरीक्षक साहेबांना फोन लावले असता कोणत्याही अवैध वरली मटक्यास परवानगी नाही परंतु काही पुरावे आहेत सांगितले तर स्टाफ पाठवतो एवढेच उत्तर मिळते या सर्व गोष्टींमुळे अवैध वरली वाल्यांची हिम्मत वाढलेली आहे.
तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करावे असे महिला वर्ग व काही सामाजिक संघटनाद्वारे करण्यात येत आहे.