तेल्हारा(प्रतिनिधी)-तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळेगाव बाजार येथे जुगारावर धाड टाकून मुद्देमाला सह आठ आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मालेगाव बाजार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संतोष साबळे नामक व्यक्तीच्या घराच्या मागच्या बंद खोलीत सुरु असलेल्या जुगारावर धाड टाकून आठ आरोपींना रंगेहाथ जुगार खेळतांना अटक करण्यात आली.यामध्ये सय्यद सादिक सय्यद अनविन, अनंता नामदेव चिकटे, संतोष पूर्णाजी व्यवहारे,शेख अस्लम शेख उस्मान,शैलेश राजकुमार घोगले,सुरेश विठल सावळे,संतोष हरिभाऊ मोरे,जाबीर खान हारून खान सर्व राहणार मालेगाव बाजार यांना अटक करून त्यांच्याजवळून १७३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई ठाणेदार नितीन देशमुख ,पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे,पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे,पो कॉ शिवशंकर शुक्ला, रोशन ठाकूर यांनी केली.