अकोला, दि.१०- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार दि.१५ रोजी सकाळी ९ वा. ५ मि. नी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार असल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.