अकोला – हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या 72 तासामध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. सद्यास्थितीत काटेपुर्णा प्रकल्प ता. बार्शिटाकळी पाणी पातळी 73.81 टक्के आहे. दगडपारवा प्रकल्पातील पाणी पातळी 80.94 टक्के आहे. तसेच जिल्हयातील इतरही नदी नाल्यांना पूर आहे. तरी संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपले मुख्यालयी उपस्थितीत राहुन पुरवाबधित क्षेत्रातील लोकांना योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा रोरा यांनी दिले आहेत.