अकोला- कोविड-19 विषाणूचा संभाव्य तिसरा टप्पा लक्षात घेवून कोविड विषाणुचे संक्रमण रोखण्याकरीता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लेवल-तीन नुसार लादण्यात आलेले निर्बंधामध्ये बदल करुन सुधारीत आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतील. अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता बुधवार दि. 3 ऑगस्ट पासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
- सर्व प्रकारची अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक दुकाने, प्रतिष्ठाने, मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतील. तथापि दर शनिवारी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने, प्रतिष्ठाने, मॉल्स दुपारी तीन या कालावधीत सुरु राहतील.
- आठवड्याच्या प्रत्येक रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बिगर अत्यावश्यक सेवा पुरविणारे आस्थापना, दुकाने, प्रतिष्ठाने बंद राहतील.
- जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप, डीझेल, सीएनजी गॅस पंप नियमितपणे सुरु राहतील.
- सार्वजनिक ठिकाणे, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे व्यायाम, चालणे, फिरणे व सायकलींग करिता सोमवार ते रविवार सायंकाळी आठपर्यंत सुरु राहतील.
- सर्व प्रकारची खाजगी व शासकीय कार्यालये ही 100 टक्के पुर्ण क्षमतेसह सुरु राहतील. तथापि प्रवासामध्ये गर्दी टाळण्याचे दृष्टीने कार्यालयामध्ये येणा-जाण्याच्या वेळेमध्ये बदल करता येईल.
- वर्क फार्म होम सुविधा असलेली कार्यालये यापूढेही त्याच पध्दतीने सुरु ठेवता येईल.
- सर्व प्रकारच्या कृषी विषयक सेवा पुरविणारे प्रतिष्ठाने, कृषी सेवा केन्द्र, सार्वजनिक बांधकामे, उत्पादन क्षेत्राशी निगडीत उद्योग, एमआयडीसी, अत्यावश्यक सेवा उद्योग प्रक्रिया व सार्वजनिक वाहतूक व मालवाहतूक कोविड नियमांचे पालन करुन नियमितपणे सुरु राहतील.
- जीम, व्यायामशाळा, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, योगा केन्द्र तसेच शासकीय व खाजगी अभ्यासिका ह्या 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत व शनिवारी दुपारी तीन पर्यंत सुरु राहतील सुरु ठेवता येतील. रविवारी संपूर्णतः बंद राहतील मात्र अशा ठिकाणी वार्ताणुकूलीत साहीत्यांचा वापर करता येणार नाही.
- सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिगर बॅंकींग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा, पोस्ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था नियमिती वेळेनुसार सुरु राहतील.
- सर्व चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स थिएटर, नाटयगृह, मनोरंजन केन्द्र ही पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
- सर्व प्रकारची धार्मीक स्थळे, प्रार्थना स्थळे, बंद राहतील.
- शाळा, महाविद्यालय सुरु करणे राज्य शासनाचे शिक्षण विभागाकडून स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.
- हॉटेल, रेस्टॉरेन्ट, खानावळ सोमवार ते शनिवार दुपारी 04.00 वाजेपर्यंत 50 टक्के आसण क्षमतेसह कोविड प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करुन सुरु ठेवता येतील. त्यानंतर केवळ पार्सल सुविधेने सुरु ठेवता येईल.
त्याच प्रमाणे जिल्हयातील बार रेस्टॉरेन्ट हे सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत व शनीवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 50 टक्के आसण क्षमतेसह सुरु राहतील. तथापी शनिवारी दुपारी तीन नंतर व रविवारी बार, रेस्टॉरेन्ट संपूर्णतः बंद राहतील. (कोणत्याही बार रेस्टॉरेन्ट मधुन होम डिलीवरीची सुविधा राहणार नाही. )सर्व प्रकारच्या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती विहीत वेळेनुसार सुरु होवून रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी सर्व प्रकारच्या अनुज्ञप्ती वाईन शॉप व बार बंद राहतील.
14.संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये रात्री नऊ ते सकाळी पाच या कालावधीमध्ये संचारबंदी लागू राहील. या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कामे वगळता मुक्त संचार करण्यास मनाई राहील.
- गर्दी टाळण्यासाठी,वाढदिवस साजरा करण्यावर लादलेले निर्बंध, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक शिबिरे, रॅली, निषेध मोर्चे इत्यादीसाठी निर्गमित केलेले निर्बंध कायम ठेवण्यात येत आहेत.
- लग्न समारंभाचे आयोजन- मंगल कार्यालये, सभागृह एकूण आसण क्षमतेच्या 50 टक्के किंवा 100 व्यक्ती या पैकी जी कमी असेल
- अंत्यविधी 50 व्यक्तीच्यामर्यादेत.
- संबंधीत आस्थापना, दुकाने, प्रतिष्ठाने इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत स्वच्छता व सार्वजनिक शिस्तीचे पालन करावे.
- कोविड नियमांचे उलंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे आदेश यापूढेही कायम राहतील. या बाबत काटेकारपणे तपासणी व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्ती प्राधिकारी, आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक, महसूल विभाग तसेच ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालीका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर, तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील.
वरील आदेश हे बुधवार दिनांक 3 ऑगस्ट 2021 पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी आदेशात म्हटले आहे.