अकोला – मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुरग्रस्त खंडाळा जि.अकोला या भागातील नागरिकांकरीता अन्नधान्य व जीवनाश्यक साहित्य पोहचविण्याऱ्या वाहणास आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली.
येथील इंग्लीस ग्रामर ॲकडमीचे संचालक प्रा. अनुप बोचरे व ॲकडमीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मदत निधी जमा करुन पुरग्रस्त भागातील 140 कुटुंबाकरीता गहु, तांदुळ, दाळ, बिस्कीट असे जीवनाश्यक वस्तू असलेले किटचे खंडाळा भागातील नागरिकांना मोफत वितरण करण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, ॲकडमीचे शिक्षीका कल्पना राव, अक्षद खंडारे, विवेक खंडारे, विवेक बोदळे व ऐश्वर्या राव आदि उपस्थिती होते.