तेल्हारा (प्रतिनिधी)– तेल्हारा तालुक्यातील ईसापुर या छोट्याश्या गावातील पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या उच्च पदावर कार्यरत असलेले महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आणी सामजिक कार्यात सदा अग्रेसर असलेले अकोला जिल्ह्यातील इसापूर या छोट्याशा गावामध्ये त्यांचे आई-वडील व बंधू यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात सदा अग्रेसर असलेले सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब यांची उपायुक्त पदी पदोन्नती करण्यात आली सदर पदोन्नती देण्यास महासभेने मान्यता दिली असुन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुलै महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज गुरुवारी ऑनलाइन घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे यांना सेवा जेष्ठता अनुभव व शैक्षणिक पात्रतेनुसार उपायुक्त पदी पदोन्नती देण्यात आली अण्णासाहेब यांची उपआयुक्त पदी पदोन्नती झाल्याची बातमी तेल्हारा तालुक्यामध्ये समजताच सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून महापौर उषा ढोरे व महासभेने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे
—————–
एक अभिमानी, स्वाभिमानी माणुसकीचे प्रत्यक्ष प्रबोधनकार, तसेच समाजकार्याचा व्यासंग निस्वार्थ सेवेतून जपणाऱ्या आद. अण्णासाहेब बोदडे ह्यांना पदोन्नतीच्या प्रसंगी समाजातील नव्या पिढीच्या स्वप्नांना बहर व उंच भरारी देणाऱ्या वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व मनस्वी अभिनंदन
विनोद विरघट
राज्यकर अधिकारी
—————–
अण्णासाहेब बोदडे यांची साहाय्यक आयुक्त पदावरुन पदोन्नती म्हणजे त्यांणी केलेले कुशल आणी पुण्यकर्माचे तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले छञपती शिवाजी महाराज राजर्शी शाहु महाराज डाॕ.बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहविण्याचे कार्य विविध सामाजीक कार्यक्रमाच्या माध्यमातून केल्याचे फळ होय
सौ.मिरातई आनंद बोदडे
सरपंच ग्रामपंचायत ईसापुर