अकोला(प्रतिनिधी)- अमरावती येथील प्रशासकीय मीटिंगमध्ये माननीय नाना पटोले साहेब व पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांना विश्व वारकरी सेना, वारकरी महामंडळ व इतल वारकरी संघटनांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती की विदर्भातून आई रुक्मिणी माता पालखी सोहळ्याच्या व्यतिरिक्त किमान 40 दिंड्याची शेकडो वर्षाची परंपरा पायी चालण्याची आहे त्यामधील प्रत्येक दिंडीतील एक व्यक्ती वारकरी स्वरूपात आणि रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यात सहभागी करण्यात यावा ही आणि वारकऱ्यांच्या विनंतीस मान देऊन रुक्मिणी माता मंदिर विश्वस्त कौंडण्यपूर व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या समन्वयातून विदर्भातील इतर दहा दिंड्या मधील दहा वारकरी रुक्मिणी माता पालखी सोहळ्यात सहभागी केल्या बद्दल विश्व वारकरी सेना व इतर वारकरी संघटनांच्या वतीने यशोमती ताई ठाकूर व कौंडण्यपूर विश्वस्त मंडळ यांचे जाहीर आभार मानतो
आज विदर्भ कन्या आई रुक्मिणी माता कौंडण्यपूर येथून पालखी सोहळ्याचे फार थाटात प्रस्थान करण्यात आले आहे. सर्वप्रथम रुक्मिणी माता संस्थांमध्ये रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे पूजन व पादुकांचा अभिषेक पालकमंत्री यशोमती ठाकूरयांच्या हस्ते करण्यात आला व परिसरातील भाविक भक्तांचे महाप्रसादाची व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी संस्थांचे सर्व विश्वस्त आवर्जून उपस्थित असून मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची कुठले प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली दिंडी सोहळा सर्वात आधी वर्धा नदीच्या पात्रावर नेन्याण्यात आला तिथे पंचायत समिती सभापती सौ शिल्पाताई हांडे, बालकल्याण सभापती सौ पूजा ताई आमले , शिवसेनेचे राजेश भाऊ वानखडे यांच्या हस्ते पूजन करून समोर अंबिका माता मंदिर येथे रुक्मिणी माता पादुकांचे पूजन करण्यात आले नंतर चाळीस वारकरी शिवशाही बस मध्ये स्थानापन्न झाले यावेळेला शिवशाही बस अतिशय उत्कृष्ट सजवलेली होती.
खरंतर पायी दिंडी सोहळा या करिता विश्व वारकरी सेना व इतर वारकरी संघटनांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण सरकारने वारकऱ्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आज बस मध्ये पंढरपूरला जात असताना अभिमान वाटत नसून असं वाटतंय आपले फार मोठे दुर्दैव आहे की आपण पंढरीची वारी हे बसणे करत आहो आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर कदाचित पांडुरंग परमात्मा आम्हाला दर्शन देणार नाही पण घरी असणारे वारकरी शरीराने जरी घरी आहेत पण मनाने मात्र पंढरपूरला आहेत म्हणून पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्या भक्तांच्या घरी दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही.
रुक्मिणी माता पालखी सोहळा मध्ये विदर्भातील इतर दिंडी मधील प्रतिनिधी समोरील प्रमाणे ह भ प श्री संजय महाराज ठाकरे कौंडण्यपूर तथा विश्वर वारकरी प्रवक्ते,ह भ प पंढरीनाथ महाराज आरू विठ्ठल रुक्मिणी संस्थान, संत बेडुजी महाराज संस्थान संतोष महाराज देशमुख, श्रद्धा सागर अकोट वासुदेव महाराज महल्ले, आखातवाडा हनुमान संस्थान सौ लताताई हातोलकर, मंथन महाराज गावंडे, विपुल महाराज भांडे, मयुर महाराज दरणे सयाजी महाराज आश्रम वेळाकेळी, सागर महाराज मोहोळ वारकरी महामंडळ, अतुल दिवाकर ठाकरे, प्रज्वल अरबळ किरण भाऊ महल्ले, सुरेश भाऊ कदम, सर्जेराव महाराज देशमुख , विणेकरी पंकज महाराज महल्ले असून विश्वस्त मंडळ मधील विजयराव डाहाके, सुरेश राव चव्हाण, अशोक राव पवार, अतुल राज ठाकरे ही मंडळी पालखी सोहळ्याच्या सोबत असून सरकारी यंत्रणेने मध्ये तहसीलदार वैभव जी फरतडे साहेब वैद्यकीय सेवे करताय ॲम्बुलन्स गाडी आहे व पोलीस प्रशासकीय गाडी सोबत आहे त्यावेळी विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर चे अध्यक्ष कमळकर काकाजी , सदानंद जी साधु ,काळे काका यांनी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था केली अशी माहिती ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आली