• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 1, 2023
29 °c
Akola
31 ° Sun
32 ° Mon
33 ° Tue
33 ° Wed
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड लेखणी

विशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक

Special Article: Rainwater harvesting

Team by Team
July 13, 2021
in लेखणी
Reading Time: 1 min read
96 1
0
विशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक
15
SHARES
690
VIEWS
FBWhatsappTelegram

आता पावसाळा सुरु आहे. पावसाचे पाणी हे आता अक्षरशः डोळ्यासमोरुन वाहून जाते. त्याऐवजी हे वाहून जाणारे पाणि विहीरी व कुपनलिकांद्वारे पुन्हा भूगर्भात साठवल्यास ते आपल्याला गरजेच्या वेळी पुन्हा वापरता येते.  पावसाचे पाणी विहिरीत सोडणे म्हणजे विहीर पुनर्भरण होय. शेतातील ओहोळ, ओढा किंवा नाल्यातून वाहून जाणारे पाणी किंवा पाण्याचा अपधाव यांचा वापर करता येतो. किंवा शहरी वा ग्रामिण भागातही आपल्या घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणीही आपण  विहीर वा कुपनलिकेत साठवून ठेवू शकतो.

आत्ता पावसाळ्यात विहीर भरल्याने पाणी जमिनीत अधिक मुरते. खोलवर जाते. ज्या जलस्तरातील पाणी उपसले गेले होतेम त्या जलस्तरात पुन्हा पाणी साठते, पाणी मुरते. पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामात  अशाप्रकारे  पाण्याने भरलेल्या  विहीरीच्या  सर्वात खोलवर असलेल्या थरापर्यंत भूजलाचे पुनर्भरण होते.

हेही वाचा

वादळी पावसामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रद्द; इंटरनेट सेवा ठप्प

अकोल्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक;११७ जणांवर कारवाई

जागा कशी निवडावी?

शेतात विहीर पुनर्भरण करतांना शेतातील ओहोळ , नाला , ओढ्या पासून किमान १२ ते १८ मिटर लांब असावी.  भूजल पातळीत घट होणाऱ्या विहिरीची निवड करावी. ज्या विहिरीत  भेगा असणारा खडक असतो त्या विहिरीची पाणी ग्रहण क्षमता अधिक असते. त्यामुळे अशी विहीर पुनर्भरणासाठी योग्य. विहिरीजवळ नाला, ओढा यासारखा स्त्रोत नसल्यास  विहिरीपेक्षा उंच भागातील अपधावेने जमा होणारे पावसाचे पाणीही विहिरीत पुनर्भरण करता येते.

विहीर पुनर्भरण पद्धती

उपलब्ध होणारे पाणी हे  शेतात साठवण आणि गाळण अशा दोन खड्ड्यात घ्यावे. साठवण खड्ड्यात मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा पी.व्ही.सी. सहा इंची  पाईपद्वारे गाळण खड्ड्यास जोडावा. साठवण खड्ड्याकडील पाईपच्या तोंडाला मोठ्या छिद्रांची जाळी बसवावी. साठवण खड्ड्यात जमा होणारे पाणी  स्थिरावून पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इ. वगळून पाणी गाळण खड्ड्यात जाईल.  भौगोलिक स्थिती नुसार साठवण व गाळण खड्ड्याच्या आकारमानात बदल करावा.

विंधन विहीर/ कुपनलिकांद्वारे भूजल पुनर्भरण

 भुपृष्ठावरील पाणी  विंधन विहीर/ कूपनलिकेत भरुन हे पुनर्भरण केले जाते. त्यासाठी  वरील प्रमाणे ओढा, नाला येथील पाणी हे साठवण खड्ड्यात वळवावे. आणि तेथून पाणी गाळण खड्ड्यात सोडावे. पुनर्भरणासाठी विंधन विहीर,कूपनलिकेच्या सभोवताली दोन मिटर लांब, दोन मीटर रुंद आणि दोन मीटर खोल खड्डा खोदावा. या खड्ड्याच्या तळापासून ०.४५ मीटर वर पर्यंत केसिंग पाईपला एक दोन से.मी. अंतरावर सर्व बाजूने चार पाच मि.मी  व्यासाची छिद्रे पाडावीत. या छिद्रांवर  नारळ दोरी(काथ्या),/ नायलॉन जाळी घट्ट गुंडाळावी. अशा प्रकारे नाल्या/ ओढ्यातील पावसामुळे वाहून येणारे गढूळ पाणी साठवण खड्ड्यातून गाळण खड्ड्यात स्वच्छ होऊन  विंधन विहीर/ कुपनलिकेत जाईल आणि पुनर्भरण होईल. या खड्ड्याच्या आकारातही  गाळण व साठवण खड्ड्याच्या आकारमानात बदल करता येईल.

पुनर्भरण करतांना घ्यावयाची काळजी

 गाळण खड्ड्यात चांगल्या प्रतीचे जाड वाळू, विटांचे तुकडे, कोळशाचे तुकडे, गोटे हे गाळणासाठी वापरावे. स्वच्छ पाणी पुनर्भरणासाठी विहीरीत जाईल याची खबरदारी घ्यावी. पाण्यासोबत गाळ गेल्यास भूप्रस्तराची सच्छिद्रता कमी होऊन  कालांतराने विंधन विहिरीची शाश्वतता कमी होत जाते. विहीरीत येणारा पाईप हा विहिरीच्या आत किमान एक मिटर असावा. गाळण खड्ड्यातून  विहीरींकडे  येणाऱ्या पाईपसाठी खोदलेला चर मातीने पूर्णतः भरून घ्यावा. तसेच दरवर्षी पुनर्भरणापूर्वी विहीरीतील गाळ काढून टाकावा. तसेच गाळण खड्डा पावसाळ्यापूर्वी स्वच्छ  करावा.

छतावरील पाण्याद्वारे भुजल पुनर्भरण

 पावसाचे जे पाणी छतावर पडते त्या पाण्याचे संकलन करुन ते विहिरीत अथवा कूपनलिकेत सोडावे.छतावरील पाणी फिल्टर करुन इमारतीजवळ असलेल्या टाकीत साठवून विहिरीत वा विंधन  विहिरीत किंवा शोषखड्डयाद्वारे जमिनीत मुरविणे. यासाठी जमिनीवर एक गाळण खड्डा करता येतो. आणि जमिनीत गाळण खड्डा करता येतो.

बाजारात तयार मिळणारे रेनी फिल्टर ही बसविता येते.  त्यात उभी उताराची स्टील जाळी असते. त्यातून त्वरीत कचरा व पाणी वेगळे होतात. कचरा खाली वेगळ्या पाईपद्वारे जमिनीवर जमा होतो व स्वच्छ पाणी दुसऱ्या पाईपद्वारे पुनर्भरण करण्यासाठी वापरता येते. गाळण खड्ड्यातून स्वच्छ झालेल्या पाण्याने विहीर, विंधन विहीर, शोषखड्डा भुजल पूनर्भरण करता येते. गाळण खड्ड्यात  चांगल्या प्रतीचे  जाड वाळू, विटांचे/ कोळशाचे तुकडे, गोटे इ. गाळणासाठी वापरावे. दरवर्षी गाळण खड्डा स्वच्छ करावा.

-माहिती संदर्भः भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा.

-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

Tags: Rain water harvesting
Previous Post

जि.प. उपकर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

Next Post

जल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृती पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

RelatedPosts

Supreme-Court
Featured

वादळी पावसामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रद्द; इंटरनेट सेवा ठप्प

May 31, 2022
अकोल्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक
Featured

अकोल्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक;११७ जणांवर कारवाई

April 1, 2022
आकोट तालुका
Featured

प्रहारच्या आकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मंगलाताई पुंडकर

March 21, 2022
लेख- दुरावस्थ रस्ते, अनास्थ लोकप्रतिनिधी!- भिमराव परघरमोल
अकोला

लेख- दुरावस्थ रस्ते, अनास्थ लोकप्रतिनिधी!- भिमराव परघरमोल

July 2, 2021
shahu-maharaj
लेखणी

लेख- दुष्काळ, महामारी आणि राजर्षी शाहूमहाराजांचा लढा- भिमराव परघरमोल

June 26, 2021
Shahu maharaj
लेखणी

लोकराजाः छत्रपती राजर्षी शाहू महाराज

June 25, 2021
Next Post
जल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृती पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

जल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृती पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

अकोला ब्रेकिंग- मनपा आयुक्त निमा अरोरा यांची जिल्हाधिकारी पदी  तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची मनपा आयुक्तपदि नियुक्ती

अकोला ब्रेकिंग- मनपा आयुक्त निमा अरोरा यांची जिल्हाधिकारी पदी तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची मनपा आयुक्तपदि नियुक्ती

Stay Connected

  • 350 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

Old Pension Scheme

Old Pension Scheme: सरकारी कर्मचारी, शिक्षकांना राज्य शासनाचा दणका, संप काळातील सात दिवसांच्या वेतनाला कात्री!

March 31, 2023
epfo

EPFO Updates : EPFO व्‍याजदरात वाढ, जाणून घ्‍या नवीन व्‍याजदर

March 28, 2023
जीएमसी

बेवारस रुग्णाची शस्त्रक्रिया, देखभाल आणि कुटुंबियांशी पुनर्भेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची सहृदयता

March 31, 2023
वन क्षेत्रातील ‘कुरणाचे कुंपण’करणार ‘शेताची राखण’

वन क्षेत्रातील ‘कुरणाचे कुंपण’करणार ‘शेताची राखण’

March 29, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks