अकोला – शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसूल ता. अकोट जि. अकोला येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी इयत्ता सहावी ते दहावी च्या वर्गात आरक्षीत प्रवर्गनिहाय प्रवेश देणे सुरु आहे. अनुसूचित जाती ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विजाभज पाच टक्के, विमाप्र दोन टक्के व दिव्यांग तीन टक्के यानुसार रिक्त जागांसाठी प्रवेश देण्यात येईल. प्रवेशासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही शाळा निवासी स्वरुपाची असून विद्यार्थ्यांना मोफत भोजन , निवास, निवासी साहित्य, स्टेशनरी, पुस्तके इ. सुविधा शासनामार्फत पुरविल्या जातात. ज्या पालकांना आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश द्यावयाचा असेल त्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण , अकोला व अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसूल ता. अकोट जि. अकोला येथे संपर्क साधावा असे आवाहन मुख्याध्यापक एस. व्ही. पहुरकर यांनी केले आहे.