उत्तर प्रदेशच्या औरैयामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका मुलाने त्याच्या वडिलांची हत्या केली. कारण इतकंच होतं की, वडिलांनी त्याला गर्लफ्रेन्डसोबत बोलण्यास मनाई केली होती. वडिलांच्या हत्येनंतर मुलगा फरार झाला आहे. कुटुंबियांनी सांगितलं की, गर्लफ्रेन्डसोबत बोलण्यास मनाई केल्यामुळे मुलगा आणि वडिलांमध्ये नेहमीच वाद होत होता.
आरोपीच्या वडिलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना भीखेपूर गावातील आहे. अरविंद कुमार हे आपल्या परिवारासोबत राहत होते. त्यांच्या परिवारात १० मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा आणि मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे. ५ व्या नंबरचा मुलगा शिवम याचं एक मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. वडील शिवमला यावरून पुन्हा पुन्हा बोलत होते. यावरून दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होतं. याच रागातून शिवमने वडिलांची त्रिशूलने हत्या केली.
मृतकाचा मुलगा प्रदीनने सांगितलं की, वडिलांनी शिवमला त्या मुलीसोबत बोलण्यास मनाई केली होती. ज्यामुळे शिवम नाराज होता. सोमवारी सायंकाळी शिवम घरातून निघून गेला होता. रात्री उशीरा तो घरी परतला. त्याने जवळ्याच मंदिरातून एक त्रिशूल आणला होता आणि झोपलेल्या वडिलांवर त्याने वार केला. त्यानंतर तो पळून गेला.
प्रदीपने पुढे सांगितलं की, वडिलांचा ओरडण्याचा आवाज आल्यावर आम्ही गेलो तर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना लगेच हॉस्पिटलमद्ये दाखल केलं. पण तोपर्यंत त्यांचं बरंच रक्त वाहून गेलं होतं. ज्यानंतर त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनेची महिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस शिवमचा शोध घेत आहेत.