तेल्हारा :- स्थानिक सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक गजानन रेवस्कर यांनी आपल्या वाढदिवशी 1 जुलै ला शोभाताई गोयनका कोविड केअर सेंटर अकोला यांना पाच हजार रुपयाची देणगी देऊन लोकजागर मंचच्या आयोजित कार्यक्रमात अनिल गावंडे यांच्या वाढदिवसी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला तेल्हारा येथील रेवस्कर गुरूजी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस संत रोहिदास महाराज सभागृहामध्ये साजरा केला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा सेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे तेल्हारा विकास मंच चे अध्यक्ष रामभाऊ फाटकर सामाजिक आंदोलन संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे माजी शिवसेना शहर प्रमुख राजेश वानखडे नागोराव वानखडे आदींची उपस्थिती होती . कार्यक्रमाला राजेश गायकवाड तेल्हारा विकास मंच युवक आघाडीचे अध्यक्ष सोनू सोनटक्के , स्वप्नील सुरे रविन्द्र वाड़ेकर , मंगेश मानकर , ज्ञानेश्वर गायकवाड , सुनील धारपवार योगेश पातोडे, अनिल दुतोंडे देवा वानखेडे , ओम भारसाकळे, रुपेश सोनवणे आदींची उपस्थिती होती