मुंबई: प्रेम करून लग्न करून घरात आणलेल्या सूनेला पाहताच सासूचे डोळे पांढरे पडले आणि चक्कर आली. सासूनं असं काय पाहिलं ज्यामुळे तिला एवढा मोठा धक्का बसला हा प्रश्न एक क्षण गावकऱ्यांसह सर्वांनाच पडला होता. प्रेम ही एक भावना आहे जी सर्व गोष्टींपेक्षा जास्त मानली जाते. प्रेमात असलेल्या व्यक्तीला कोणताच भेदभाव दिसत नाही फक्त नितांत प्रेम दिसतं. प्रेमासाठी संपूर्ण समाजाशी लढा देण्यासही ते मान्य करतात.
तरुणाने लग्न केल्याची माहिती गावभर झाली. सारेजण तयारीला लागले आणि नव्या सूनेचं स्वागत करण्यासाठी सर्वजण कामाला लागले. मात्र प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच होणार होतं हे मात्र कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. आपल्या सूनेचा चेहरा पाहून तरुणाच्या आईला मोठा धक्का बसला.
सूनेला पाहण्याची त्यांना खूप घाई होती. मुलगा घरी येताच त्यांनी सूनमुख पाहायचं म्हणून पुढे आल्या आणि मोठा धक्का बसला. या तरुणानं ट्रन्सजेंडरशी लग्न केलं होत. ट्रान्सजेंडरला घरात सून म्हणून घेऊन आल्याचा धक्का या तरुणाच्या आईला सहन झाला नाही आणि ती बेशुद्ध पडली.