अकोट:- समता ,बंधुता व लोककल्याण राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याचा हा मूलमंत्र होता.अज्ञान हेच माणसाच्या विनाशाचे मुळ कारण आहे. उच्चविद्याविभूषित छत्रपती शाहू महाराजांनी ओळखले म्हणून त्यांनी राज्यात शिक्षणाचा पाया रोवला त्याचाच परिणाम स्वातंत्र्यानंतर देशातील कोल्हापूर हे शंभर टक्के शिक्षित शहर म्हणून ओळखल्या जात होते.राजश्री शाहू महाराजांच्या मदतीमुळेच बालगंधर्व घडू शकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकनेते होऊ शकले अशा अनेक व्यक्तींना घडवण्याचे श्रेय राजश्री शाहू महाराजांनाच जाते. अत्युच्च कोटीची व्यक्तिमत्व राजश्री शाहू महाराज होते.
आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक भाऊसाहेब पोटे येथे आयोजित कार्यक्रमामध्ये युवक काँग्रेस राज्यप्रवक्ता कपिल ढोके तथा शिवव्याख्याते प्रा.संतोष झामरे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचे विविध पैलू विषद करताना अशा विविध घटना नमूद केल्यात. सर्वप्रथम राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन बंडू पाटील कुलट यांचे हस्ते करण्यात आले डॉ.सुहास कुलट, कुणाल कुलट, आर्किटेक्ट माधुरी पोटे (कुंभारे) शिव गावंडे , ,प्राचार्य रावणकार यांनी पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य अतुल म्हैसणे, प्राचार्य वाल्मिक भगत,प्रा.डी. आर साबळे यांची उपस्थिती होती प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा आर्किटेक अनंत गावंडे यांनी विषद केली. कार्यक्रमाला अविनाश डिक्कर, प्रवीण भगत, कु.मनाली गावंडे यासह भाऊसाहेब पोटे विद्यालयातील शिक्षक शिक्षिका सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन अनंत गावंडे यांनी तर आभार प्रा.अजय घनबहाद्दूर यांनी मानले पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली