तेल्हारा- तेल्हारा तालुक्यातील दानापुर येथिल प्राथमीक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या वाडीअदमपुर उपकेंद्रामध्ये ईसापुर येथिल नागरीकांकरीता कोरोना लसीकरणाचा कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पला ईसापुर येथिल नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला जास्तीत जास्त नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे या करीता सौ.मिराताई बोदडे सरपंच यांणी पुढाकार घेतला यावेळी उपसपंच ग्रामपंचायत ईसापुर महादेवराव नागे यांणी स्वतः लस घेवुन लोकांना लस घेण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवुन देवुन नागरीकांच्या मनातील भिती दुर केली यावेळी पञकार आनंद बोदडे , खंडुजी घाटोळ, अर्चना मोरे आशा वर्कर यांणी घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवुन दिले या कॅम्पमध्ये ८० नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे,यावेळी वैद्यकीय अधिकारी योगेश प्रभे,आरोग्य सेविका राहाटे,गवई, आशा वर्कर रंजना भोजने, शिला भोजने,भारती नागे, संगनक ऑपरेटर नाईकवाडे
आदी उपस्थित होते
—————–
ईसापुर ग्रामपंचायत येथे कोरोना लसीकरण कॕम्प घेण्यासाठी वैद्यकिय अधिकारी दानापुर तथा तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करुन गावातील ग्रामस्थांचे १००% लसीकरण करण्याचा प्रयत्न मी करनार आहे ज्या प्रमाणे कर्मचारी यांणा लसीकरण करण्यासाठी वयाची अट नाही त्याच प्रमाणे सरपंच उपसपंच सदस्य
यांचे करीता सुध्दा वयाची अट शिथिल करावी
सो.मिराताई आनंद बोदडे
सरपंच ग्रा.पं.ईसापुर
मी स्वतः लसीकरण करुन घेतले असुन मला कुठल्याही प्रकारचा ञास झाला नाही त्यामुळे गावातील नागरीकांनी आपले लसीकरण करुन घ्यावे
महादेवराव नागे
उपसरपंच ग्रा.प.ईसापुर