अकोला : जिल्ह्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रविवारी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व (Pre-monsoon)पावसामुळे (Rain) काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, पत्रेही उडाली असून, ग्रामीण भागात लिंबू, केळीसह फळबागांचे नुकसान झाले.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार-पाच दिवस वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला होता. शनिवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर रविवारी अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास झालेल्या पावसाने शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडली.