अकोला- येत्या 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी होणार आहे. हा जयंती महोत्सव घराघरात साजरा करा असे आवाहन धनगर समाज युवा मल्हार सेना अकोला जिल्हाध्यक्ष सागर खराटे यांनी केले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पराक्रम बघायचे झाल्यास या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्यादेवी होळकर अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.
महाराणी अहिल्यादेवींची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.
विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्यादेवींनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्यादेवींचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होत.
महाराष्ट्रात नंबर १ ची धनगर समाजाची धनगर समाज युवा मल्हार सेना ही संघटना आहे. पण आज आपल्या देशावर महाराष्ट्रावर कोरोणा महामारी चे संकट आले असून आपण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती शासनाने नेमून दिलेल्या नियमावलीनुसार सोशल डिस्टंसिंग चे पालन करून नियमित सॅनिटायझर व मास्कचा चा वापर करून साजरी करावी. तसेच प्रत्येक घराघरात घरातील सर्व कुटुंब मिळून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन हारार्पण व घरावर पिवळा झेंडा लावून व घरातील सर्वांनी पूजन करून साजरी करावी. घरातील लहान मुले असतील तर त्यांना मातेचा इतिहास व कार्याची माहिती द्यावी व जयंती निमित्त आपल्या घरासमोर किमान एक तरी झाड लावावे. सध्या कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. शक्य होईल जिथे जिथे समाज बांधव अडचणीत असतील तेथे त्यांना मदत करावी. आज समाजाला आपल्या मदतीची गरज आहे. असे ऑनलाइन झालेल्या बैठकीमध्ये सांगण्यात आले.
त्यामध्ये सर्व वाड्या वस्त्यात राहणाऱ्या बांधवांना व मेंढ्या घेऊन भटकंती करत असलेल्या मेंढपाळ बांधव यांना महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या हाकेला हाक व समाजावर जिथे अन्याय होत असेल तेथे सर्वात पहिल्यांदा धनगर समाज युवा मल्हार सेना पोहचते. आज कोविड काळात पण सर्व पदाधिकारी जीवाचे रान करून मदत करतात. या ऑनलाइन झालेल्या बैठकीमध्ये धनगर समाज युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष मनोज सिराम सर, प्रदेश उपाध्यक्ष विनोद अण्णा खेमनार, युवा नेते प्रकाश भैय्या सोनसळे सर, यांच्या मार्गदर्शनात ही मिटिंग पार पडली. व सूचनेचे पालन करत धनगर समाज युवा मल्हार सेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष सागर खराटे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती घरा घरातच राहून साजरी करा असे आवाहन समस्त समाज बांधवांना केले आहे.