मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दहशतवादी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल सात किलो युरोनियम दोघांकडून हस्तगत केले. दरम्यान, या दोघांना युरेनियमसह अटक करण्यात आली आहे. युरेनियम विक्रीच्या शोधात ते होते. ही माहिती एटीएसला समजताच त्यांच्यावर छापा टाकत दोघांना युरेनियमसह अटक केली आहे. या युरेनियमची किंमत अंदाजे २१ कोटी असल्याने एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. युरेनियम हा रसायनशास्त्रातील दुर्मिळ धातूंपैकी एक मानला जातो. अण्वस्त्रे बनवण्यासाठी या धातूचा वापर करण्यात येतो.
महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नागपाडा येथून दोन जणांना अटक केलीय. या दोघांकडे तब्बल सात किलो १०० ग्रॅम युरेनियम असल्याचे त्यांच्याकडे आढळून आले आहे. याची किंमत जवळजवळ २१ कोटी ३० लाख इतकी असल्याचे सांगण्यात आले. अणू ऊर्जा कायदा, १९६२ अंतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
अधिक वाचा : ब्रेकिंग! राज्याच्या आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती होणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरिक्षक संतोष भालेकर यांना एक व्यक्ती युरेनियमचे तुकडे विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती. दरम्यान, सापळा रचून या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीपैकी एकाचे नाव जिगर पंड्या असे आहे. याबाबत जिगर पंड्याकडे चौकशी केल्यावर त्याचा मित्र अबु ताहिर याने हे युरेनियमचे तुकडे दिल्याची माहिती पोलिसांना दिली.