नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तुणमूल काँग्रेसने हॅटट्रिक केली आहे. आसाममध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश आलं आहे. केरळमध्ये () LDF ने सत्ता राखली, तर तामिळनाडूत एआयडीएमकेची सत्ता पालटली असून डीएमकेने मोठा विजय मिळवून सत्ता खेचून आणली. तिकडे पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित एनडीएने काँग्रेसला धोबीपछडा दिली.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची हॅटट्रिक, पण ममता बॅनर्जी हरल्या
देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विजयाची हॅटट्रिक नोंदवली. मात्र 292 विधानसभा सदस्य असलेल्या या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाच नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर निसटता विजय मिळवला.
दरम्यान, संध्या. 6.30 वाजेपर्यंतच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 292 पैकी तृणमूलला 216, भाजप 73, काँग्रेस 00 आणि अन्य 03 जागांवर आघाडीवर होते. बंगालमध्ये बहुमतासाठी 147 जागांची गरज आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा जास्त जागा मिळवून एकहाती सत्ता स्थापन खेचून आणली आहे.
बंगालमधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी)
तृणमूल काँग्रेस -216
काँग्रेस -00
डावे – 03
भाजप – 73
एकूण – 292
बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)
तृणमूल काँग्रेस -219
काँग्रेस -23
डावे – 19
भाजप – 16
एकूण – 294
आसाममध्ये भाजपने गड राखला
आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. आसाममध्ये भाजपला 79, काँग्रेसला 46 आणि अन्य 1 अशा जागांवर आघाडी मिळाली.
आसामधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी)
भाजप – 79
काँग्रेस – 46
अन्य – 1
एकूण – 126
तामिळनाडूमध्ये उलटफेर
तामिळनाडू विधानसभेत मोठा उलटफेर झाला आहे. सत्ताधारी AIDMK ला मोठा झटका बसला आहे. DMK ने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक झाली. DMK ने यापैकी 155 जागांवर आघाडी मिळवली तर सत्ताधारी AIDMK ला 78 जागांवर आघाडी घेता आली. अन्य 1 असं चित्र तामिळनाडूत पाहायला मिळालं.
तामिळनाडूतील पक्षीय बलाबल 2021
DMK – 155
AIDMK – 78
अन्य – 1
एकूण – 234
केरळमध्ये डाव्यांनी गड राखला
केरळमध्ये सत्ताधारी LDF ने पुन्हा डाव मांडला आहे. एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या LDF ने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला. 140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी LDF ने 87, काँग्रेसने 46, भाजप 6 आणि अपक्ष-इतर 01 असं चित्र पाहायला मिळालं.
केरळमधील पक्षीय बलाबल 2021
LDF – 87
काँग्रेस – 46
भाजप – 06
इतर – 01
एकूण – 140
पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक निकाल
पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. 30 सदस्य संख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजपप्रणित एनडीएने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पावलं टाकली. पुद्दुचेरीमध्ये NDA ला 15, काँग्रेसला 10, इतर 5
पुद्दुचेरीमधील पक्षीय बलाबल 2021
NDA -15
काँग्रेस – 10
इतर – 05
एकूण 30
(टीप : वरील आकडे हे संध्याकाळी 7 पर्यंतच्या कलानुसार आहेत. या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतात)