अकोला, दि. 2 राज्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा सोमवार दि.3 मे रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे असेल
सोमवार दि.3 मे रोजी सकाळी 10 वा 30 मि. नी अमरावती येथून शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय कडे प्रयाण व सकाळी 11 वा.10 मि.नी. आगमन व कोवीड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 12 वा. महिला व बालविकास विभागाचा आढावा, दुपारी 12 वा. 45 मि.नी अकोला विश्रामगृहकडे प्रयाण व दुपारी 12 वा.55 मि.नी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह येथून केशव नगर जवळ ऑटो स्टॅाप, कौलखेडकडे प्रयाण व दुपारी सव्वा दोन वाजता गुरुवर्य श्री. रंगरावजी टापरे, कौलखेड येथे आगमन व सदिच्छा भेट, दुपारी 2 वा.45 मि.नी गोट फॉर्म सांगवी मोहाडी, अकोट रोड, अकोलाकडे प्रयाण व दुपारी तीन वाजता आगमन व श्री. नरेश देशमुख, संचालक गोट बँक यांच्याशी चर्चा. दुपारी साडेतीन वाजता दर्यापूर मार्ग अमरावतीकडे प्रयाण.