अकोला : दि.1 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1733 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1365 अहवाल निगेटीव्ह तर 368 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 470 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 13 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 195 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 40723(31463+9083+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 368 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 195 असे एकूण पॉझिटीव्ह 563 आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 207856 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 204973 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2496 नमुने होते. आजपर्यंत एकूण 207794 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 176331 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
368 पॉझिटिव्ह
दि.1 दिवसभरात ३६८ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५८ महिला व २१० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-१९, अकोट-५१, बाळापूर-३४, तेल्हारा-सात, बार्शी टाकळी-१५, पातूर-दोन, अकोला-२४०. (अकोला ग्रामीण-३३, अकोला मनपा क्षेत्र-२०७)
दरम्यान काल (दि. 30) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 195 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
13 जणांचा मृत्यू
दि.1 दिवसभरात १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात न्यु राधाकिसन प्लॉट येथील ४५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पंचशील नगर येथील ५४ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील ७३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, मेहरे नगर येथील ३५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, तर व्हिएचबी कॉलनी येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, बेलुर ता. अकोट येथील ७१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अजनी ता. बार्शीटाकळी येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच अकोलखेड ता.अकोट येथील ९० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, पिंपळगाव ता.बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अकोली जहागीर ता. अकोट येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, वरुड ता. तेल्हारा येथील ३९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, तर नवेगाव छान्नी ता. पातूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
470 जणांना डिस्चार्ज
दरम्यान दि.1 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील १३, आधार हॉस्पीटल येथील तीन, केअर हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील पाच, अर्थव हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एक, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर पास्टूल येथील १०, के.एस.पाटील हॉस्पीटल येथील तीन, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, फतेमॉ हॉस्पीटल येथील दोन, अकोल ॲक्सीडेंट येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील तीन, इनफिनीटी हॉस्पीटल येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ३८५ असे एकूण ४७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
5382 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 40723(31463+9083+177) आहे. त्यात 702 मृत झाले आहेत. तर 34639 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5382 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.