• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

१८ वर्षांवरील लसीकरण : रजिस्ट्रेशन होत नसल्याने गोंधळ वाढला

Team by Team
September 25, 2021
in Corona Featured, Featured, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 0
0
vaccination
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :  १८ वर्षांवरील नागरिकांना १ मे पासून कोरोनावरील लस दिली जाणार असून यासाठीच्या नोंदणीकरण प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने  १८ वर्षावरील सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, कोविन ॲपवरून नोंदणी करताना अजूनही ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण होत असल्याचा मेसेज येत असल्याने गोंधळ आहे.

१ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील सर्व लोकांना लस दिली जाणार आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांनी ही लस मोफत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाकडे मोठ्या आशावादी दृष्टीने पाहिले जात आहे. व्यापक प्रमाणात लसीकरणाची मोहीम हाती घेतली जात असली तरी लसीच्या पुरेशा साठ्याबाबत अनेक राज्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

लसीचे पुरेसे साठे तसेच लसीचा दर यावरून कित्येक राज्यांनी आधीच आपले हात वर केलेले आहेत. या राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड यांचा समावेश आहे. १८ ते ४५ वयोगटातील २.९० कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार असल्याचे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री रघू शर्मा यांनी मात्र वेळेत लसीकरण मोहीम पूर्ण होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने लस निर्मितीला हायजॅक केले असून आम्ही लस निर्मात्या कंपन्याकडून महागड्या दराने लस खरेदी करू शकत नाही, असे झारखंडच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पंजाब आणि छत्तीसगडच्या आरोग्य मंत्र्यांनीदेखील मोहिमेच्या अनुषंगाने प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.

देशात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरणाबाबत गोंधळ उडत आहे. अनेकांनी जन्म वर्ष टाकताच ४५ वर्षांनंतरचेच रजिस्टर करू शकतात असा मेसेज येत आहे. १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

असे करा रजिस्ट्रेशन… 

  •  www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा Register मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा
  • OTP आल्यानंतर Vaccine Registraction form भरा,
  •  schedule appointment वर क्लिक करा. पिन कोड टाका,
  • सकाळच्या टप्प्यात की दुपारच्या याबाबत सेक्शन सिलेक्ट करा,
  • व्हॅक्सिन सेंटर आणि तारीख निवडा,
  • अपॉइंटमेंट बुकवर कन्फर्म करा,
  • त्यानंतर व्हॅक्सिनेशन डिटेलचा मेसेज मोबाईलवर येईल.
Tags: corona vaccineCorona Vaccine to above 18
Previous Post

अकोला : पेट्रोलपंपाच्या वेळेत बदल

Next Post

श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वाफ परिणामकारक: डॉ. धनंजय साऊरकर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
Steaming

श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वाफ परिणामकारक: डॉ. धनंजय साऊरकर

suicide

आईच्या मृतदेहाशेजारी दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशी, कुणीही फिरकले नाही; माणुसकीही गोठली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.