अकोला : दि.2 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1403 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1139 अहवाल निगेटीव्ह तर 264 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 737 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 16 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 107 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 38043(29652+8214+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 264 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 107 असे एकूण पॉझिटीव्ह 371 आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 198189 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 195348 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2456 नमुने होते. आजपर्यंत एकूण 198131 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 168479 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
264 पॉझिटिव्ह
दि.2 दिवसभरात २६४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९४ महिला व १७० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-१६, अकोट-१२, बाळापूर-३२, तेल्हारा-१९, बार्शी टाकळी-दोन, पातूर-५५, अकोला-१२८. (अकोला ग्रामीण-२५, अकोला मनपा क्षेत्र-१०३)
दरम्यान काल (दि. 25) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 107 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
16 जणांचा मृत्यू
दि.2 दिवसभरात १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य दहातोंडा ता. मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते, रामदासपेठ येथील ६४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, किनखेड ता. बार्शीटाकळी येथील ५० वर्षीय पुरुष असून या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर मो. अली रोड सिटी कोतवाली येथील ६१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील ३९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खदान येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, देवरी ता.अकोट येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. तर आंबेडकर नगर येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. चिखलगाव येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. व्याळा ता. बाळापूर येथील वर्षीय पुरुष ६५ रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुग्णालयातून तिघांचे मृत्यू झाले. त्यात जनूना ता.बार्शीटाकळी येथील ७६ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, सिंधी कॅम्प येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते तर गोरक्षण रोड येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
737 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, पाटिल हॉस्पीटल येथील एक, अर्थवा हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील सात, यक्कीन हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथील १७ तर होम आयसोलेशन मधील ६५५ असे एकूण ७३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
5615 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 38043(29652+8214+177) आहे. त्यात 645 मृत झाले आहेत. तर 31783 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5615 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.