तेल्हारा (प्रतिनिधी) – स्थानिक डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गोपाल ढोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.एम.पी. चोपडे उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. कृष्णा माहुरे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा.स्वप्नील फोकमारे, प्रा.विजय खुमकर, प्रा.डी.बी.भुईभार ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मध्ये एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत रोहन तायडे बी.ए. भाग-२ व कु. जान्हवी श्रीहरी खारोडे बी.ए. भाग-१ यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक कु. मनीषा सुरेश भिवटे एम.कॉम. भाग-१ यांनी तर तृतीय क्रमांक वैभव अनंतराव भोंडे भाग-२ यांनी पटकावला. या ऑनलाइन वकृत्व स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.कृष्णा माहुरे यांनी केले.