लखनौ : महाराष्ट्रपाठोपाठ उत्तर प्रदेशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. येथे मंगळवारी एका दिवसात १८ हजार नवे रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. २४ तासांत येथील ८५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या उत्तर प्रदेशात ९५ हजार ९८० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट केले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवदेखील कोरोनाबाधित झाले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.
शुरुआती लक्षण दिखने पर मैंने कोविड की जांच कराई और मेरी रिपोर्ट पॉजिटिव आई है।
मैं सेल्फ आइसोलेशन में हूं और चिकित्सकों के परामर्श का पूर्णतः पालन कर रहा हूं। सभी कार्य वर्चुअली संपादित कर रहा हूं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 14, 2021
देशातील रोजच्या आकडेवारीचा विचार केल्यास कोरोना रुग्णसंख्येमध्ये महाराष्ट्रपाठोपाठ उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांमध्ये २०४ टक्के वाढ झाली आहे. लखनौत रोजच्या रुग्णसंख्येत ३५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. गंभीर बाब म्हणजे येथील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचे ९८ टक्के होते. आता हे प्रमाण ८५ टक्क्यांवर आले आहे.
अभी-अभी मेरी कोरोना टेस्ट की रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मैंने अपने आपको सबसे अलग कर लिया है व घर पर ही उपचार शुरू हो गया है।
पिछले कुछ दिनों में जो लोग मेरे संपर्क में आये हैं, उन सबसे विनम्र आग्रह है कि वो भी जाँच करा लें। उन सभी से कुछ दिनों तक आइसोलेशन में रहने की विनती भी है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 14, 2021
उत्तर प्रदेशात आतापर्यंत ७ लाख २३ हजार ५८२ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ९,३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथील ६ लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत. राजधानी लखनौसह वाराणसी, प्रयागराज, गोरखपूर, कानपूर या शहरांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या शहरांत मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे.