अकोला(प्रतिनिधी)- सद्या कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजविला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे अशातच रक्ताचा तुटवडा भासत आहे.अशातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील १० ते १२ तरुणांनी अकोला शासकीय रुग्णालयात रक्तदान केले. यामध्ये यामध्ये बॉबी पळसपगार,प्रहार तालुका अध्यक्ष,सुशील कांबळे, आशिष सावळे अक्षय वानखडे,ऋषी शिंदे, जय तिडके, अमर तायडे, राम बिल्लेवार, धीरज मोरे, सुरज वरठे, सनी शिरसाट, ऋतिक वानखडे यांनी रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एक वेगळे च अभिवादन दिले.