वेलिंग्टन (न्यूझीलंड): महिला अत्याचाराची प्रकरणे वाढत असलेल्या न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे एक चमत्कारिक घटना घडली आहे. शारिरीक संबंधावेळी महिलेच्या संमतीशिवाय कंडोम काढल्याने संबधित पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून संबधित आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाला असून येत्या महिन्याच्या अखेरीस संबधित पुरुषाला कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. त्याला या प्रकरणात शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली आहे.
या चमत्कारिक प्रकरणाबाबत बोलताना एका तज्ज्ञाने आपले म्हणणे मांडले आहे. ‘कंडोम घालून सेक्स करणे आणि कंडोमशिवाय सेक्स करणे यात फरक आहे. कंडोमच्या वापरामुळे दोघेही सुरक्षित असतात. मात्र, एका जोडीदाराला माहीत नसताना कंडोम काढल्यास जोडीदाराच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. एचआयव्ही अथवा लैंगिक आजाराचा धोका त्यातून संभवतो. त्याशिवाय महिलेच्या इच्छेविरोधात ती गर्भवती राहू शकते, हे गंभीर आहे. महिला जोडीदार कंडोमसह सेक्स करण्यास सहमत असते. मात्र, तिच्या सहमतीशिवाय पुरूषाने कंडोम काढून सेक्स करणे याला स्टील्थिंग असे म्हणतात. त्यामुळे असा गुन्हा दाखल होणे सहज शक्य आहे. यातून जोडीदाराविषयीची समानतेची भावना वाढीस लागेल.