• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिंदु नववर्ष निमित्त 111मंदिरांमध्ये धर्म ध्वज प्रदान करणार; संस्कृती संवर्धन समितीचा उपक्रम..

Team by Team
April 12, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
81 0
0
हिंदु नववर्ष निमित्त 111मंदिरांमध्ये धर्म ध्वज प्रदान करणार; संस्कृती संवर्धन समितीचा उपक्रम..
14
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)-संस्कृती संवर्धन समिती, अकोला वतीने दरवर्षी विराट मोटरसायकल रॅली काढण्यात येते. मागील वर्षी व या वर्षी सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने ही रॅली रद्द करून यावर्षी अकोला शहरातील 111 मंदिरांना धर्म ध्वज प्रदान करण्यात येणार आहे, असे आभासी पत्रकार परिषदेत संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा यांनी सांगितले. या  वर्षी शहरातील 111 मंदिरांना धर्मध्वज प्रदान करण्यासाठी मान्यवरांचे  विविध गट तयार केले असून ते हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर शहरातील सर्व प्रमुख मंदिरांना दिले जाणार आहे. तसेच गत एक वर्षांत कोरोना महामारीच्या काळात स्थानिक पोलिसांनी सक्षमपणे, संयमाने व मानवीय दृष्टिकोन ठेवून शहरात जे लक्षणीय कार्य केले आहे, याची कृतज्ञता म्हणून व आभार व्यक्त करण्या करीता संस्कृती संवर्धन समितीचे सदस्य प्रातिनिधीक स्वरूपात शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेदारांना भेटणार आहे व धन्यवाद मानणार आहे तसेच भारतमातेची प्रतिमा भेट  वस्तू म्हणून  प्रदान  करणार आहे.

तसेच शहरातील काही प्रमुख मंदिरां समोर व प्रमुख चौकात भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. सध्या कोरोना काळात रक्ताची खूप गरज भासत आहे, अकोल्यातील नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ९ ते सायं ५वाजेपर्यंत डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये आपण अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे.हिंदु नववर्षाच्या व गुढीपाडवा निमित्ताने शहरातील तमाम स्त्री पुरुषांना व तरुण मुलामुलींना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापल्या घरासमोर व घराजवळच्या मंदिरां समोर तसेच जवळ पासच्या चौकात रांगोळया काढून नववर्षाचे भव्यदिव्य स्वागत करावे आणि प्रत्येक घरावर धर्म ध्वज ऊभारावा, असे आवाहन संस्कृती संवर्धन समिती, अकोला चे अध्यक्ष डॉ आर . बि. हेडा, कार्याध्यक्ष हेमेंद्र राजगुरू, रा. स्व. संघ विभाग संघचालक नंदूजी देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, संयोजक महेश जोशी, सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर यांनी केले आहे. या प्रसंगी सौ  इंद्रायणी देशमुख, नरेंद्र राठी, पवन केडिया, राहुल राठी, ऍड मोतिसिंग मोहता, निलेश देव, प्रकाश घोगलिया, प्रशांत जोशी, प्रशांत पाटील, समीर थोडगे, शशांक जोशी, रुपेश शाह, मोहन मिश्रा, हरिदास ठाकरे, विकास  राठोड, दिपक मायी, खेमराज भटकर, प्रवीण राखोंडे, श्रीपाद कुलकर्णी,  अभिजित भाटवडेकर, राम भिरड,गजानन घोंगे, सुनील पसारी, राहुल  इंगळे, अतुल कोंडोलीकर, सुधीर देशपांडे, निलेश जोशी, आशिष चंदाराना, संदेश खंडेलवाल, सुरज भागेवार,  सारंगधर करे, कैलास कदम,  पंकज  देशमुख, नितीन गवळी व इतर संस्कृती संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

Tags: संस्कृती संवर्धन
Previous Post

घर बसल्या रेशन कार्डावर जोडा नव्या सदस्याचं नाव, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Next Post

DRDO recruitment 2021 : डीआरडीओ मध्ये आठशे वैज्ञानिकांच्या भरतीची तयारी

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
डीआरडीओ

DRDO recruitment 2021 : डीआरडीओ मध्ये आठशे वैज्ञानिकांच्या भरतीची तयारी

Remdesivir

‘रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.