अकोला (सुनिल गाडगे)- प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस ही एक पर्वणी असते ते साजरे करण्याचेही अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत.मात्र येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव बोळे यांनी आपला वाढदिवस निराधार बेघरांसमवेत संत गाडगेबाबा बेघर निवारा येथे साजरा केला.यावेळी तेथील रहिवासी बेघरांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसले.दरम्यान प्रत्येकाने येथेच आपला वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष दुर्गा भड,उषा राऊत,शुभम काजे,रोहन बुंदेले,हर्षल पाटील,ज्ञानेद्र पर्वते,शुभम जामोदे,अखिलेश अनासाने यावेळी उपस्थित होते.