दानापूर(सुनिलकुमार धुरडे)– लॉक डाऊन व कोरोना चा वाढता आलेख पाहता तेल्हारा तालुक्यातील दानापूर व परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना यांचा फटका बसला आहे. बाजार समितीच्या व ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंदी मुळे काढलेला माला व्यापारी उचलायला तयार नाहीत.हि वास्तविकता आहे.
त्यामुळे 250 ते 300 रु ला विकल्या जाणारी वांगे आता 20 ते 30 रुपयाला विकावे लागत आहे. टमाटर च्या 20 किलो च्या कॅरेट ला 150 रुपयांचा भाव ,तोडणीला 50 रु खर्च.तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे गाव वाण नदीच्या काठावर वसलेल याचं नदीवर वारी हनुमान येथे हनुमान सागर प्रकल्प असल्याने या परिसरात पाण्याची मुबलकता त्यामुळे या परिसरात बागायती क्षेत्रफळ मोठं आहे .त्यात शेतकरी मोठी मेहनत करून भाजीपाला व फळ पिके घेतात .मात्र कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा अधिकाऱ्यांनी लावून दिलेले नियमात चे पालन करीत ग्रामीण भागातील बाजारपेठ व बंद चा फटका भाजीपाला, व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सोबतच माल बाजार पेठेत आणल्यास त्यांची व्यापारी वर्ग उचल करण्यासाठी तयार नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे.
1) वांग्याला 20 ते 30 रु भाव 18 ते 20 किलोच्या कॅरी बॅग लाभाव
2) लग्न शॉट कट असल्याने मोठा फटका
कोरोना येण्याची आधी याचं वांगी पिकाला या वेळी 250, ते 300 रुपयांचे भाव मिळत असत गेल्या 2 वर्षाचा ताळेबंद केला असता 1 एकरात 150 ते 175 लाखाचे नुकसानाला भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र ग्रामीण भागातील बाजार बंद मुळे वांग्याला 20 ,ते 30 रुपयांचा भाव 18 किलोच्या कॅरी बॅग ला मिळत आहे भाव त्यामुळे शेतकऱ्यांना झाड निरोगी ठेवण्यासाठी वांग्याची तोडणी करून त्यांना गुरांच्या पुढे टाकण्याची वेळ आली आहे. सोबतच लग्न करण्यावर घातलेल्या निरबंध ग्रामीण भागात लग्ना मध्ये वांग्याच्या भाजीला फार महत्त्व आहे मात्र ,लग्न करतांना घालून दिलेल्या लोकांच्या उपस्थितीती वर शासनाचे लक्ष असल्याने लग्न अगदी शॉट कट मध्ये होत असल्याने वांग्याची मागणी कमी झाली आहे. त्यातच शेकऱ्यांनच्या समोर उभं ठाकलेल नैसर्गिक संकट, वाढत तापमान यामुळे भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.याकडे शासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
मी दोन एकर क्षेत्रावर वांगी पिकांची मल्चिंग वर लागवड केली आहे. मला या करीता 60 ते 70 हजार रुपये खर्च आला आहे . गेल्या 2 वर्षी अगोदर याचं महिन्यात वांग्याला 18 ते 20 किलो च्या कॅरी बॅग ला 250ते 300 रुपयांचा भाव मिळत होते .मात्र बाजार पेठ व ग्रामीण भागातील बाजार बंद असल्याने भावात मोठी घट झाली आहे. त्यामुळे लागलेला खर्च ही निघेल की नाही यांत शंका आहे.
सुरेश पिलात्रे.
भाजीपाला उत्पादक शेतकरी दानापूर
सुनिलकुमार धुरडे दानापूर..