• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सावधान! कोरोना विषाणूमध्ये बदल, महाराष्ट्रात आढळले घातक व्हॅरियंट्स

Team by Team
September 25, 2021
in Featured, Corona Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार
13
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

देशातील महाराष्‍ट्र, पंजाबमधील कोरोना रुग्‍णवाढ ही चिंताजनक बाब आहे. महाराष्‍ट्रात गेल्‍या २४ तासांमध्‍ये कोरोनाचे २८ हजार ६९९ नवे रुग्‍ण आढळले आहेत. देशातील सर्वाधिक रुग्‍णसंख्‍या असणार्‍या १० जिल्‍ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्‍ट्रातील आहेत. पंजाबच्‍या लोकसंख्‍येचा विचार करता या राज्‍यात होणारी रुग्‍णवाढ गंभीर आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्‍य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मागील २४ तासांमध्‍ये देशात ४७ हजार २६२ नवे रुग्‍ण आढळले आहेत. तर २७५ जणांचा मृत्‍यू झाला आहे. सर्वाधिक रुग्‍ण असणार्‍यांमध्‍ये महाराष्‍ट्रातील पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोला जिल्‍ह्यांचा समावेश आहे, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

गुजरात, मध्‍य प्रदेशमध्‍येही दिवसाला अनुक्रमे १७०० ते १५०० रुग्‍ण आढळत आहेत. गुजरातमध्‍ये सर्वाधिक रुग्‍ण हे सूरत, अहमदाबाद, बडोदरा, राजकोट आणि भावनगरमधील आहेत. तर मध्‍य प्रदेशमधील भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्‍जैन आणि बेतूलमध्‍ये सर्वाधिक रुग्‍ण आहेत, असेही आरोग्‍य सचिव भूषण यांनी सांगितले. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर सण व उत्‍सव आहेत. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधाची सर्व काळजी घेवूनच यामध्‍ये सहभागी व्‍हावे, असे आवाहनही आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

कोरोना विषाणूमध्ये बदल :

विदेशातही कोरोनाचे नवे स्ट्रेन, व्हेरियंट आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार INSACOG ने नव्या व्हेरियंटवर काम सुरु केले आहे. देशातील अनके राज्यांमधून १०७८७ कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांमधून ७७१ नवे व्हेरियंट आढळले आहे. यातील ७३६ पॉझिटिव्ह चाचण्यांमध्ये युके व्हेरियंट आढळला आहे. ३४ कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांमध्ये दक्षिण अफ्रिकेचा व्हेरियंट आढळला आहे. तर १ चाचणीमध्ये ब्राझील व्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे एकूण १८ राज्यांमध्ये डबल म्युटेंट व्हेरियंट VOCs आढळला आहेत. त्यामुळे या नव्या व्हेरीयंटने देशाची चिंता आणखी वाढली आहे.

देशातील १० प्रयोगशाळांची समूह असणारी इंडियन सार्स कोव-२ कंसोर्टियम ऑन जेनोमिक्स Indian SARS-CoV-2 Consortium on Genomics (INSACOG)संस्था या नव्या व्हेरियंटवर संशोधन करत आहे. यातील विविध जीनोमिक व्हेरियंट जवळपास सर्वच देशात आढळले आहे. यासाठी विदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. यातील अनके प्रयोगशाळांमध्ये विदेशी नागरिकांच्या कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांचा अभ्यास केला जात आहे. अधिकतांश राज्यातून तपासण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये डबल म्युटेंट व्हेरियंट आढळले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे नवे व्हेरियंट, स्ट्रेन आढळत आहेत. महाराष्ट्रात तपासण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये डिसेंबर २०२० च्या तुलनेत E484Q आणि L452F व्हेरियंट आढळले आहे. हे व्हेरियंटमुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून संक्रमित रुग्णांची संख्या पून्हा वाढत आहे. १५ ते २० टक्के चाचण्यांमध्ये नवे व्हेरियंट आढळत आहे. महाराष्ट्रासह केरळमध्येही कोरोनाचे नवे व्हेरियंट आढळत आहेत. केरळमधील १४ जिल्ह्यामधील २०३२ कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांमध्ये N440K हा कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. तर आंध्रप्रदेशातील ३३ टक्के चाचण्यांमध्ये N440K हा व्हेरियंट सापडला आहे. तर तेलंगणामध्येही ५३ टक्के चाचण्यांमध्ये हा व्हेरियंट मिळाला आहे.

त्याचप्रमाणे युके, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलियासग १६ विविध देशांमध्येही कोरोनाचा हा नवा व्हेरियंट सापडत आहे. देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत सर्वाधित म्हणजे ४७ हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. यातील ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tags: corona new straincorona new varient
Previous Post

जागतिक क्षयरोग दिन; जिल्हा क्षयरोग मुक्त करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

तेल्हारा येथील पाच विद्यार्थी राजस्थान निम्स युनिव्हर्सिटी एथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम !

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
तेल्हारा येथील पाच विद्यार्थी राजस्थान निम्स युनिव्हर्सिटी एथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम !

तेल्हारा येथील पाच विद्यार्थी राजस्थान निम्स युनिव्हर्सिटी एथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम !

Indian Buddhist General Assembly telhara

भारतीय बौध्द महासभा तेल्हारा तालुका कार्यकारिणी गठीत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.