अकोला– राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग कार्यालय व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व रुग्णांची सीबीनेट तपासणी करुन एमडीआर रुग्णांना औषधोपचारावर आणुन जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य विभागाला दिले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अधिक्षिक डॉ. आरती कुलवाल, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. विरेन्द्र वानखडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक आदि उपस्थित होते.
जिल्ह्यात क्षयरोग कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबविल्यामुळे क्षयरोग कार्यक्रमाचे उद्दिष्ट गाठण्यात राज्यातून अकोला जिल्हास दुसरा क्रमांक मिळाला. उद्दिष्टे साध्य करणासाठी प्रयत्न केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील काळात देखील आणखी चांगल्या प्रकारे काम करुन २०२४ पर्यंत जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याकरीता जोमाने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गोळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंत उन्हाळे तर आभार जनईकर यांनी मानले.