अकोला– मा.सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार अकोला जिल्हा परिषदेच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ना.मा.प्र.) या प्रवर्गातील सर्व १४ सदस्यांची तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील २८ सदस्यांची निवडणूक रद्द करण्यात येऊन ही पदे सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडून प्राप्त आदेशानुसार रिक्त असलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समित्यांमधील २८ सर्वसाधारण जागांपैकी महिलांचे आरक्षण निश्चितीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी, जि.प.-पंस. निवडणूक संजय खडसे यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला यांचे अध्यक्षतेखाली निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी, जि.प.-पंस. निवडणूक संजय खडसे व अन्य कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया राबविली. तसेच पंचायत समितीच्या गणांसाठी त्या त्या तालुका मुख्यालयी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया राबविण्यात आली.
या सोडतीमध्ये खालीलप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक विभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित झालेले जि.प. निवडणूक विभागः-
04-तळेगाव, 15-कुटासा, 42-दगडपारवा, 18-बपोरी, 03-अडगाव, 34-अंदुरा, 30-कानशिवणी
सर्वसाधारण म्हणून शिल्लक राहिलेले जि.प. निवडणूक विभागः-
01-दानापूर, 10-अकोलखेड, 17-लाखपुरी, 29-कुरणखेड, 39-देगाव, 48-शिर्ला, 26-घुसर
तर पंचायत समिती च्या सदस्य पदांसाठी निर्वाचक गणांचे खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले-
तेल्हारा- सर्वसाधारणः- 03-हिवरखेड भाग1, 06-अडगाव बु., सर्वसाधारण स्त्रीः- 13-वाडी अदमपूर, 15-भांबेरी
अकोट- सर्वसाधारणः- 19-अकोलखेड, 25-मुंडगाव, सर्वसाधारण स्त्रीः- 18-पिंप्री खु., 28-रौंदळा
मूर्तिजापूर- सर्वसाधारणः- 39-माना, 46-कानडी, सर्वसाधारण स्त्रीः- 34-लाखपुरी, 35-ब्रह्मी खुर्द
अकोला- सर्वसाधारणः- 49-दहिहांडा, 66-चिखलगाव, सर्वसाधारण स्त्रीः- 52-घुसर, 57-पळसो, 58-कुरणखेड
बाळापूर- सर्वसाधारणः- 75-पारस भाग-1, 80-वाडेगाव-2, सर्वसाधारण स्त्रीः- 72-निमकर्दा, 78-देगाव
बार्शिटाकळीः- सर्वसाधारणः- 86-मो-हळ, 89-महान, सर्वसाधारण स्त्रीः-83-दगडपारवा, 91-पुनोती बु.
पातूरः- सर्वसाधारणः- 105-आलेगाव, सर्वसाधारण स्त्रीः- 96-शिर्ला, 97-खानापूर.