तेल्हारा(प्रतिनिधी)- वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कम्पनी ने व्यक्तिगत विजजोडनी तसेच वितरण रोहित्र बंद पडण्याची मोहीम सुरू केली होती त्याला प्रतिकार म्हणून शेतकरी संघटनेने महाराष्ट्र भर आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला होता त्याची सुरवात अडगाव ता तेल्हारा जिल्हा अकोला येथून बीजबिल सोक्षमोक्ष आंदोलनाने करण्यात आली दि 16 मार्च 2021 रोजी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडगाव विद्युत फिडर वर जाऊन वीज देयके दुरुस्ती नसल्या बद्दल असंख्य वर्षांपासून देयकेच दिली नसल्याचे सांगत,जी दियके शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहेत ती मीटर रिडींग आणि एनर्जी ऑडिट रिपोर्टसी सुसंगत नाहीत एमएससी डिसीएल नि दावा केलेल्या देयकांनपोटी क्रॉस सबसिडी आणि सरकारी सबसिडी मार्फत ती रक्कम यापूर्वीच वसूल केल्यागेलेली आहे सर्व देएके किमान 55% तरी वाढीव असल्याचे निदर्शनास आलेले आहे अशा अन्याय देएकांचा आग्रह धरून विद्युत जोडणी कापण्यात आल्यास शेतकरी संघटना सत्याग्रही मार्गाने आंदोलन तीव्र करेल असे सांगण्यात आले होते त्या त्या अनुषंगाने आज दि 17 मार्च 2021 रोजी तेल्हारा येथे विद्युत वितरण कम्पनी च्या उपविभागीय कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्री ललित पाटील बहाळे यांच्या नेतृत्वात कार्यलय गाठले व तेथील डेप्युटी इंजिनिअर ,च्या अनुपस्थिती त शाखा अभियंता आकाश गुप्ता व यांच्या सोबत विद्युत देएके बद्दल या विषयावर चर्चा केली असता त्यांनी जे तेल्हारा तालुक्यातील शेती पंपा चे कनेक्शन कापले होते ते पुन्हा लगेच श्री ललित पाटील बहाळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा जोडण्यात आले व पुढे आम्ही कुठल्याही शेतकऱ्यांच्या शेती पंपा चे कापणार नाही अशी ग्वाही पचाभाई आणि गुप्ता जी यांनी त्यांच्या वतीने दिली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक कायंदे यांनी मध्यस्ती करण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे सोशल मीडिया राज्य प्रमुख विलास ताथोड, माहिती तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, बेलखेड प्रमुख दादाभाऊ टोहरे, हिंगणी चे सरपंच हरिदास वाघ, दिलीप वानखडे, आकाश देऊळकार, उमेश कोरडे,दीपक वाघ, गणेश कोरडे, विजय ताथोड, कैलास ताथोड, संदीप ताथोड, प्रदीप लासुरकर, दिलीप वानखडे, संतोष सुशिर, राजू सुशिर,महोम्मद एजाज, अजर पठाण, हमीद टापदार, आयास टांगेवाले, मोहम्मद सादिक,बाळूभाऊ वाकोडे, प्रमोद टोहरे, करण टोहरे, सतीश माडी, निलेश सुशिर, महोम्मद फाजील, डौलात सुशिर, जाणकिराम पाटील, सुधीर साखरे, गणेश बळीराम सुशिर, अनंत तळोकार,निलेश उमाळे,आदी शेतकरी उपस्थित होते.