• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाशिवरात्री : पूजेची योग्य वेळ व पद्धत, काय करावे काय करू नये ? जाणून घ्या सर्व विधी

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 10, 2021
in Featured, कार्यक्रम, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
83 1
0
महाशिवरात्री : पूजेची योग्य वेळ व पद्धत, काय करावे काय करू नये ? जाणून घ्या सर्व विधी
13
SHARES
597
VIEWS
FBWhatsappTelegram

भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते. या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.

पूजेचा विधि आणि योग्य वेळ:
यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. या दिवशी पूजेची सर्वात शुभ वेळ रात्री 12:06 ते दुसऱ्या दिवशी 12 मार्चला रात्री 12:55 पर्यंत आहे. महाशिवरात्री प्रथम प्रहर पूजा 06:27 PM ते 09:29 PM, द्वितीय प्रहर पूजा 09:29 PM ते 12:31 AM (मार्च 12), तृतीय प्रहर पूजा 12 मार्च 12:31 AM ते 03:32 AM,चतुर्थ प्रहर पूजा 03:32 AM ते 06:34 AM पर्यंत. चतुर्दशी तिथीचा प्रारंभ 11 मार्च रोजी 02:39 PM पासून 12 मार्च 03:02 PM वाजेपर्यंत असणार आहे. 12 मार्च को शिवरात्री व्रत पारण वेळ 06:34 AM ते 03:02 PM पर्यंत असणार आहे.

व्रत पद्धत व विधी :                                                                                                                                                महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे. बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

महाशिवरात्रीची पूजा करतांना या गोष्टींचे करा आचरण :-

काळे कपडे परिधान करू नका:

जर तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत केले असेल आणि विधीवत पूजा करणार असाल तर या पूजेत बसतांना काळे कपडे परिधान करू नका. काळे कपडे अशुभ मानले जातात. याऐवजी निळे आणि पांढरे वस्त्र परिधान केले तर शुभ मानलं जातं.

अश्या अक्षदा वाहू नका:

कोणतिही पूजाविधी करतांना अक्षदा अर्पित केल्या जातात. जर तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करणार असाल तर मात्र हे लक्षात ठेवा की अक्षदा ह्या अखंड असाव्या. तांदुळाचे तुकडे नसावे. जर तुमच्या घरी अखंड तांदुळ नसेल तर बाजारातून घेऊन या, जर ते शक्य नसेल तर मात्र अक्षदा वाहू नका.

असा अभिषेक करू नका:

महाशिरात्रीच्या पूजेत नारळाच्या पाण्याने अभिषेक करू नये. असं म्हटलं जातं नारळाचं पाणी लक्ष्मीदेवींची प्रिय वस्तू आहे, म्हणून शिवजींना नारळ पाण्याचा अभिषेक करू नये. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते ज्यात पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप शेण,गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. तसेच बेलाची पाने वाहून पूजा करतात.

शंख वाजवू नये:

श्रीविष्णू, लक्ष्मी माता यांच्या पूजनात शंखाचा वापर केला जातो. अन्य देवतांच्या पूजनातही शंख वापरण्याची पद्धत आहे. मात्र, महादेव शिवशंकरांच्या पूजेवेळी शंख वापरला जात नाही कारण शिवपुराणातील एका कथेनुसार, शंखचूड नामक एक पराक्रमी दैत्य होता. दैत्यराज दंभ याचा तो पुत्र. त्याने अहंकारातून केलेल्या अत्याचाराची परिसीमा गाठल्यावर महादेव शिवशंकरांनी शंखाचूडाचा वध केला. या कारणामुळे शिवपूजनात शंखातून जलार्पण केले जात नाही किंवा शंख वर्ज मानला जातो.

भगवान शंकरांना ह्या गोष्टी आहे प्रिय:

शंकराला पाणी खूप आवडते. मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो.पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे. केशर वाहिल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात आणि लग्न लवकर होते. शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारत्मक बदल दिसून येतात. तसेच समाजात देखील त्या व्यक्तिला मान सन्मान प्राप्त होतो. मध हे गोड असते. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: MahashivratriMahashivratri muhuratMahashivratri pooja vidhi
Previous Post

जास्त दर आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Next Post

दारुड्याचा प्रताप फौजीच्या पत्नीला व मुलास लोखंडी पाईपने मारहाण,गुन्हा दाखल

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
दारुड्याचा प्रताप फौजीच्या पत्नीला व मुलास लोखंडी पाईपने मारहाण,गुन्हा दाखल

दारुड्याचा प्रताप फौजीच्या पत्नीला व मुलास लोखंडी पाईपने मारहाण,गुन्हा दाखल

अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.