अकोला :- सोमवार रोजी जागतीक महिला दिनानिमित्त श्री विद्यावर्धिणी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष गजानन बोराळे व दिनदयाल प्रभात शाखेच्या सहकार्यानी विविध क्षेत्रातील महिलांच्या घरी जावुन पुष्प शब्दसुमंनानी, सन्मानपत्र, महिलांसाठी सांस्कृतिक ज्ञानाचा संग्रह, शिवनिर्णय कालदर्शिका देवून त्यांना शुभेच्छा तसेच प्रत्येक स्त्रीनी आपल्या आयुष्यामध्ये विविध संकटाला सामोरे जाऊन दुसऱ्यानवर अवलंबून न राहता विविध क्षेत्रामध्ये ठसा उमटून आपल्या कुटुंबाला इच्छाशक्ती,क्रियाशक्ती व ज्ञानशक्तीने पुढे नेणाऱ्या शक्तीला सलाम करण्यात आला.
यामध्ये शिक्षिका, समाजसेविका, वकील, डॉक्टर, परिचालीका, राजकारणी,व्यवसाईक, कामगार, कार्यरत असलेल्या महिला यामध्ये श्रीमती सविता संजय बोंडे , प्रा. प्रियाकुमारी जितेंद्र धाबे, सौ अलका राजाभाऊ देशमुख, प्रा.डिम्पल राहूल मापारी, अॅड. संगीता एन भाकरे, डॉ. संगीता अशोक ओळंबे, सौ देवश्री किशोर ठाकरे, सौ शुंभागी नारायण किनगे , सौ वर्षा अरविंद पिसोळे, सौ निलीमा रामभाऊ तिजारे, सौ सुनिता सुभाष मेंटागे, सौ प्रिया राजु पारतकर, सौ शारदा संजय भडांगे, श्रीमती कल्पना संजय दळवी , व इतर महिलांचा समावेश हाेता.या उपक्रमाचे आयोजन व नियोजन गजानन बोराळे यांनी केले यावेळी , संघ परिवारातील विलास जोशी, गजानन घोंगे, हेमंत रामेकर, डॉ अशोक ओळंबे, रमण पाटील, योगेश गोतमारे, प्रंशात बानोले, बाळूभाऊ लटकुटे, साेबत हाेते.