तेल्हारा :- जुन्या शहरातिल माळेगाव नाक्या जवळून जाणाऱ्या नाल्याच्या पाण्यावर ज्या शेतकऱ्याने शेती करण्याचा प्रयत्न केला व गहू पेरला त्या नाल्यामध्ये केर कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाल्यामुळे नाला जाम झाला व पाणी पुढे सरकू न शकल्यामुळे सदर शेतकऱ्यांच्या पिकांला पानी न मिळू शकल्याने त्या शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे तेल्हारा नगरपालिकेने माळेगाव नाका येथून शेती कडे जाणाऱ्या नाल्या मधील जमा झालेला केरकचरा त्वरित काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे .
स्थानिक सुपीनाथ नगर मधील सोनू सोनटक्के या शेतकरी-शेतमजूराने गावालगतच एका शेतकऱ्यांचे शेत ठोक्याने घेऊन त्या शेतामध्ये गहु पेरला होता सुरुवातीला ज्या नाल्याच्या पाण्यावर गहू पेरला होता तो नाला या काही दिवसांमध्ये केर कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने जाम झाला त्यामुळे नाल्याद्वारे सांडपाणी वाहून जात होतं ते पाणी वाहन बंद झाल्यामुळे सदर शेतकऱ्यांनी जो गहू पेरला त्या गावाला उमब्या येऊ लागताच शेतकरी पाणी देऊ शकला नाही कारण ज्या नाल्यातून पाणी वाहत होते ते पाणी वाहने बंद झाल्यामुळे सदर शेतकऱ्यांचे शेतामधील गहु सोकु लागल्याने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे तरी तेल्हारा नगर परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सदर नाल्यांच्या साफसफाई कडे लक्ष देउन त्या नाल्यांमध्ये जमा झालेला केरकचरा गाळ काढून पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था करावी जेणेकरून शेतकऱ्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा या शासनाच्या धोरणानुसार जी शेती करण्याचे प्रयत्न केले त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल तसेच कचऱ्यामुळे पाणी जमा झाले त्या साचलेल्या पाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली असून मच्छरांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे हा सर्व प्रकार थांबवायचा असल्यास नाला साफसफाई नगरपालिकेने सुरू करावी व नागरिकांच्या आरोग्या सोबतच शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा सोडवावा अशी मागणी होत आहे .