तेल्हारा :- मन चंगा तो कठोती मे गंगा या दोह्याच्या माध्यमातून मन चांगले असेल तर त्याला कुठल्याच तिर्थस्थळी जाण्याची गरज नाही. ईश्वर व्यक्तीमध्ये व व्यक्तीच्या मनातच असतो असा संदेश देणारे आधुनिक विचारसरणीचे क्रांतिकारी संत रोहिदास महाराज यांची जयंती तेल्हारा विकास मंच शाखा जिजामाता नगर व सुपीनाथ नगरच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व त्यांचा जय जय कार करण्यात आला .संत रोहिदास महाराज एक समतावादी विचाराचे ,अंधश्रद्धा, कर्मकांड,विषमता यावर कडाडून प्रहार करणारे विज्ञानवादी विचाराचे क्रांतिकारी संत होते अशा महान संतांचे विचार सर्वांनी अंगीकारावे असे तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी सांगितले या वेळी चर्मकार संघटनेचे पदाधिकारी गजानन रेवस्कर गुरुजी विकास मंचचे मोहन श्रीवास, सोनू सोनटक्के , सुनील डाबेराव , स्वप्नील सुरे, राजेश देशमुख ,नितीन मानकर ,अमोल आकोटकर , जान भटकर , गौतम दामोदर , विजय पवार, कैलास श्रीवास , गजानन तुंबळे , अरुण मेसकर , दिपक दामोदर, मंगेश हागे ,शिवा राऊत , संतोष ठाकरे ,गजानन चव्हाण, पंकज वानखडे ,आकाश बाहाने ,रमेश चव्हाण ,मुन्ना सोनटक्के ,किरण मोरे निखिल कापसे ,,निलेश मामनकार,कुशाल सोनटक्के , विठ्ठल ठाकरे , प्रफुल देशमुख ,सुनील उबाळे, योगेश मस्तूद, उमेश उज्जैनकर, गोपाल श्रीवास ,गिरधारी श्रीवास, बजरंग गव्हाणे ,ऋषिकेश कदम, सागर अरुळकार ,प्रकाश पडोळे, सुनील गर्जे, अंकित खोपाले ,अर्जुन खारोडे, लखन सोनटक्के ,दिनेश अवारे इत्यादी तेल्हारा विकास मंच चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.