• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

Team by Team
February 27, 2021
in Featured
79 1
0
बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ आता एका प्रकरणामुळे अडचणीत आल्या आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी किशोर वाघ यांना २०१६ मध्ये अटक देखील झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असून यादरम्यान आता त्यांच्याविरोधात लाललुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा १२ फेब्रुवारी रोजी नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या आदेशानुसार १५ लाखांची नुकसान भरपाई देण्यासाठी परळच्या महात्मा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन भगत यांनी चार लाखांची लाच मागितल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून डॉ. भगत यांच्यासह मेडिकल रेकॉर्डच्या नोंदी ठेवणारे किशोर वाघ आणि संदेश कांबळे यांना रंगेहाथ पकडले होते.

किशोर वाघ यांच्या विरोधात ५ जुलै २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला होता. त्यांना त्यावेळी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अद्याप ते सेवेतून निलंबित आहेत. त्यावेळी त्यांच्या परेल येथील निवासस्थानाची झडती घेण्यात आली होती. किशोर वाघ यांनी त्यांचे मालमत्तेसंदर्भात ६ फॉर्मस लाचलुचपत प्रतिबंधक विभागास सादर केले होते.

यातून किशोर वाघ यांचे स्वतःचे व कुटुंबियांचे नावे असलेल्या मालमत्तांची तसेच त्यांनी केलेल्या खर्चाची व त्यांना विविध कायदेशीर सेवाकालावधीतील परीक्षण कालावधी दि. १ डिसेंबर २००६ ते दि. ५ जुलै २०१६ दरम्यान त्यांना कायदेशीर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास सुरु असून यादरम्यान आता त्यांच्याविरोधात लाललुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या कारवाईवरुन चित्रा वाघ यांनी आपल्याला काहीच माहित नसल्याचे म्हटले आहे. पतीविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे आपल्याला कळवलं नाही. लाच घेताना तिथे माझा पती तिथे नव्हता. तरीही त्याच्याविरोधात केस दाखल केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

माझ्या नवऱ्याला व्हॉट्स ॲपवरुन नोटीस पाठवली. नोटीस पाठवायला माणसं नव्हती काय? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

Tags: chitra wagh
Previous Post

मुलीची बदनामी थांबवा; अन्यथा सामूहिक आत्महत्या

Next Post

पुजा चव्हाण च्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे-भाजप महिला आघाडी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पुजा चव्हाण च्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे-भाजप महिला आघाडी

पुजा चव्हाण च्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे-भाजप महिला आघाडी

दहशतवाद विरोधी पथकाकडून हातात धारदार शस्त्र तलवार घेवून दहशत निर्माण करणाऱ्या इसमास अटक

दहशतवाद विरोधी पथकाकडून हातात धारदार शस्त्र तलवार घेवून दहशत निर्माण करणाऱ्या इसमास अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.