तेल्हारा :- कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती स्थानिक सुपीनाथ नगर मधील कर्मयोगी संत गाडगेबाबा सभागृहामध्ये तेल्हारा विकास मंचच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी तेलारा विकास मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे व मूर्तीचे पूजन करुण गाडगे बाबांचा जयजयकार करीत जयंती उत्साहात साजरी केली यावेळी तेल्हारा विकास मंचच्या माध्यमातून नगरपालिकेला यापूर्वी स्थानिक सुपीनाथ नगर मधील सामाजिक सभागृहावर संत गाडगेबाबा सभागृह असे फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार नगरपालिकेने फलक लावल्याबद्दल नगरपालिकेचे मंचच्या वतीने आभार मानण्यात आले व लवकरात लवकर हे सभागृह जनतेच्या सेवेत रुजू करावे अशी मागणी नगरपालिकेला करण्यात आली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप निंबोळकर , तसेच तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर , मंगेश ठाकरे , गणेश मोकळकर, मोहन श्रीवास , गिरधारी श्रीवास , श्रीकृष्ण अमृतकर आकाश निंबाळकर पंकज मोडोकार, स्वप्निल सुरे ,नितीन मानकर, विठ्ठल मामनकार, सोनू सोनटक्के , संतोष ठाकरे , शिवा राउत , कैलास श्रीवास , गोटू वाघ , विजय पवार , दिपक दामोदर , गणेश इंगळे ,मंगेश ठोंबरे , मंगेश हागे, रविंद्र फाड़के , दत्ता थारकर गौतम दामोदर , गजानन तुंबडे, , संतोष तायडे, राजेश वाघ , सुनील हिवराळे , गोपाल डाबेराव , विकी तायडे, किशोर आकोटकार वरणकार , श्रीकांत चव्हाण, रामदास फुलकर, इत्यादी तेल्हारा विकास मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते