तेल्हारा ( प्रा.विकास दामोदर )– दिवसा गांव लख्ख करुन रात्री किर्तनाच्या माध्यमातुन माणसांची मनं स्वच्छ करणारे,या देशातिल शेवटचे खरे संत..महान कर्मयोगी गाडबेबाबा देव म्हणून किंवा संत म्हणून न मिरवता माणूस म्हणून माणसाची सेवा करण्यात धन्यता मानणारे असे भारतातील प्रथम स्वच्छतादूत गाडगे महाराज यांची जयंती गट विकास अधिकारी यांच्या दालनात कोरोना नियमांचे पालन करत मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी बारगिरे साहेब,यांनी प्रतिमेचे रीतसर पूजन करून पुष्प माल्यार्पण केले याप्रसंगी अधीक्षक गाडगे साहेब यांचे समायोचित भाषण झाले त्यांनी आपल्या भाषणात गाडगे बाबांची उदारता, शिक्षण प्रेम व समाजसेवेचे निःस्वार्थ व्रत यावर प्रकाश टाकला.,तर राजेश बाभुळकर यांनी गाडगे बाबांनी सांगितलेल्या दससूत्रीची आज कोरोना काल पाहता नितांत गरज आहे हे पटवून सांगितले, एवढेच नव्हे तर गाडगे बाबांनी जो स्वच्छता विषयक जीवनभर आपल्या कृतीतून प्रचार व प्रसार केला तो आजही आपण सर्वाना किती मोलाचा आहे हे सांगितले याप्रसंगी , शिक्षण विस्तार अधिकारी दादासाहेब वरठे, भाऊसाहेब आकोते, पांडे साहेब, उन्हाळे साहेब, गुजर साहेब, ए पि. ओ. तायडे साहेब, गणेश देशमुख, सुमित काशीकर परिचालक भोजने ई. उपस्थित होती.