तेल्हारा( प्रा. विकास दामोदर)– दि.१९ तळेगाव पातूर्डा येथे वैचारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमाचे पालन करून समाज प्रबोधन करण्याच्या हेतूने व्याख्याते तथा लेखक भिमराव परधरमोल सरांनी आपल्या शैलीत छत्रपती शिवाजी महारज्यांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकत सांगितले की, छत्रपती महाराजांच्या राज्यांमध्ये शेतकरी सर्वांगाने सुखी होता शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी सर्व उपयोजना करत बी-बियाणे, खते, औत-फाटा, पैसा उपलब्ध करून मापक कर घेऊन परवडणारी शेती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. म्हणून ते शेतकऱ्यांची तारणहार होते असे ते म्हणाले राजेश नृपनारायण सर यांनी शिवाजी महाराज यांची समानता विषयक टृष्टीकोन मांडला , समाज सुधारकांचे विचार कसे सारखे असतात हे पटवून दिले, यावेळी सरपंच लालसींग डाबेराव, वासुदेवराव पाचपोर (सामाजिक कार्यकर्ते ) माजी प.स. सदस्य राजू इंगळे, राष्ट्रीय वारकरी परिषद तेल्हारा तालुका अध्यक्ष, प्रहार सेवक प्रा रविंद्र ताथोड, रामा मात्रे, गजानन मेसरे, दादाराव नेमाडे, ग्रा प सदस्य गणेश इंगळे, मनोहर खंडेराव, पुडंलिक सरप बाळू ताथोड प्रवीण दिवाळे, वसंता ताथोड श्रीकृणां मारोडे, उमेश इंगळे, मारोती ताथोड,आशिष मात्रे, पुरुषोत्तम पाचपोर, शुभम ताथोड, विनोद ताथोड गणेश उमरावतें अनिल ताथोड सुधीर ताथोड अनिल मात्रे, इत्यादी हजर होते