वाडी अदमपूर -दिनांक 19/02/ 2021 रोजी शिवजयंती निमित्ताने गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य व शिवप्रेमी मित्र मंडळ वाडी अदमपूर यांच्यावतीने गाव वाडी अदमपूर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 33 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप गरजू व गरीब रुग्णांसाठी 24 तास तत्पर असतो गरजू व गरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करण्यासाठी सतत झटत असतो गेल्या काही वर्षांपासून गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप रक्तदान चळवळीमध्ये सिंहाचा वाटा देत जवळपास अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्तदान केले आहे शिवजयंतीच्या या रक्तदान शिबिरा करिता ग्रुपचे संस्थापक अमित गजाननराव वरणकार यांच्या मार्गदर्शनाखाली गर्जूचे रक्तदाते ग्रुपचे तेल्हारा तालुका अध्यक्ष सुनील भाऊ आमले , पंचायत समिती सदस्य अरविंद भाऊ तिव्हाने, गावचे सरपंच रुपेश शेठ राठी, छत्रपती अकॅडमी चे संचालक धिरज सर इंगळे , विठ्ठल भाऊ खारोडे, सोनु तिव्हाणे ,भूषण भाऊ राठी, प्रदीपभाऊ जाधव, सोनुभाऊ इंगळे, सागर भाऊ भाकरे,गोपाल भाऊ भाकरे, गोपाल भाऊ घोरड, सुरेंद्र भाऊ भोंगळ,विष्णु शेळके ,कैलास कोतकार,जितु गणेश जाधव,समस्त ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी मित्र मंडळ तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश भाऊ सोळंके व गावातील समस्त गावकरी मंडळी ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थित सदर कार्यक्रम हा सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून पार पाडण्यात आला.