अकोला(दीपक गवई)– दि बेरार जनरल एजुकेशन सोसायटी द्वारा संचालीत सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मधील मेरिट ची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहिली. सत्र २०१९ – २० मधील पदव्युत्तर विभागात सीताबाई कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मधील ५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. कु. निता गणेश जाधव संगीत विषयांमध्ये २री मेरीट, राजू अरुण वानखडे इतिहास विषयांमध्ये सातवा मेरीट, सचिन रामभाऊ इंगोले इतिहास विषयांमध्ये 9 वा मेरिट, समाजशास्त्र विषया मध्ये कु. सुषमा निळकंठ डोंगरे तिसरी मिरीट तसेच कु. नूतन प्रभुदास थोरात 9 वी मेरिट म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मधुन गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. संस्थे चे अध्यक्ष ॲड मोतीसिह मोहता व मानद सचीव पवन माहेश्वरी यांच्या प्रेरणेने या प्रसंगी महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष रूपचंदजी अग्रवाल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डि सिकची तसेच डॉ अनिरुद्ध खरे, डॉ कैलास वानखडे, डॉ भास्कर वझिरे, डॉ सुनील गायगोल, प्रा अमोल गावंडे सहित सर्व विभाग प्रमुखांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत व अभिनंदन केले.