तेल्हारा (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरात दिनांक ९ फेब्रूवारी ला भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आकाश आमटे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते आयोजित स्पर्धे मध्ये विदर्भा च्या कान्या कोपऱ्या तुन शेकडो युवक युवती स्पर्धक आले होते . सकाळी ठीक 6 वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला हारपर्ण करून करण्यात आली यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी अशोक तापडिया यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले .
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक वृषभ तिवसकार द्वितीय क्रमांक प्रशिश थेटे तृतीय क्रमांक संजय झाकणे तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक कु.वैष्णवी रामकीसन आहेवार द्वितीय क्रमांक दीपाली शाळीग्राम भावे तृतीय क्रमांक वैदही उमेश ईखार यांनी पटकावला आहे. त्याच बरोबर मुलांसाठी 8 व मुलींसाठी 10 प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली या
मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकांची चुरस अत्यंत लक्षणीय होती या स्पर्धेत एक 55 वर्षीय बंडू भाऊ चवरे या स्पर्धकाने पूर्ण 10 कि. मी. ची फार कमी वेळात स्पर्धा पूर्ण केल्याने या स्पर्धकाने सर्वांचे लक्ष वेधले .कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभ तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झाला यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गोपाल ढोले तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार राजेश गुरव , डॉ अशोक तापडिया स, राम घंगाळ , राम पाऊलझगडे शांतिकुमार सावरकर , राजेन्द्र कोरडे , लोणकर सर,सुमेध गायगोळ, प्रा.सचिन थाटे, रामा फाटकर ,कोपरे सर, वाघ सर, पप्पूसेठ सोनटक्के , चंद्रकांत मोरे, पंकज कांगटे, नेमाडे सर, सुईवाल सर, शंकर तायडे, शरद मानकर, प्रकाश सोनोने, सचिन राऊत, राजेंद्र निर्मळ, नितीन बोदडे, अजय बोदडे, नितीन ढोंगले, सुरेश तेलगोटे ,उमेश गायगोळ, व्यासपीठावर
उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार राजेश गुरव यांनी स्पर्धांकाना मार्गदर्शन केले व अध्यक्षीय भाषण डॉ प्राचार्य गोपाल ढोले यांनी केले , तर यावेळी प्रथम व द्वितीय मुले मुली विजेत्या स्पर्धकांना माजी सैनिक भाई प्रभाकरराव सावरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शांतिकुमार सावरकर यांच्या कडून स्मृती चिन्ह देण्यात आले . या स्पर्धेत मोठ्या संख्येने विदर्भातील स्पर्धक सहभागी झाले होते . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.सचिन थाटे तर सूत्रसंचालन प्रदीप राजुस्कर यांनी केले या कार्यक्रमाला लक्ष अकॅडमी, सैनिक संघटना, जय बजरंग क्रिकेट क्लब ,ब्लुय फायर फुटबॉल टीम ,याचे विशेष सहकार्य लाभले व मॅरेथॉन स्पर्धेला तेल्हारा पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावला व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय टीम उपस्थित होती. राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या अभिनव स्पर्धेचे तेल्हारा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.