संतोषने प्रेमविवाह करून चांगल्या घरात राहण्यासाठी जमीन विकून आलिशान घर बांधले. परंतु, गर्लफ्रेंडचे दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध आहे, अशी संतोषला शंका आली. त्याने तीन मजुरांना बोलावले, नव्या घरात पाण्याची टाकी बांधण्यासाठी त्यांच्याकडून ४ फुटांचा खड्डा खोदून घेतला, नंतर गर्लफ्रेंडला बोलावून तिची हत्या केली, खड्ड्यात तिचा मृतदेह गाडला आणि त्यावर सिमेंटने प्लास्टर करून टाकले.
डिसेंबर महिन्यात भिकनगाव परिसरात घडलेल्या छायाच्या हत्येचा खुलासा झालेला आहे. यामध्ये पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना सांगितली. हत्येतील मुख्य आरोपी म्हणजेच छायाचा प्रियकर संतोष सध्या फरार असून त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार संतोषने छायाची हत्या केली आणि एका खड्ड्यात गाडून त्यावर प्लास्टर करून फरार झाला आहे.
या हत्येमध्ये तीन मजुरांना अटक केली असून त्यांची नावे सुनील, अनिल आणि सकूबाई अशी असून त्यांनी पोलिसांना सांगितले की, “छाया ही विवाहित होती. तरीही संतोष तिच्यावर खूप प्रेम करायचा. प्रेमविवाह केल्यानंतर घराची गरज भासेल म्हणून त्यांनी आलिशान घर बांधले. त्यासाठी संतोषने जमीनदेखील विकली. याच नव्या घरात संतोषने आपली प्रेमिका छायाची हत्या केली आणि घरामध्ये एक खड्डा काढून त्यात छायाच्या मृतदेहाला पुरून टाकले.”
“संतोषने या मजुरांनी सांगितले होते की, छायाने त्याच्याबरोबर गद्दारी केली होती. तिचे आणखी कोणासोबत शारीरिक संबंध होते. त्यामुळे संतोषने मजुरांना बोलून पाण्याची टाकी खोदण्याचा नावाखाली खड्डा काढून घेतला आणि त्याच खड्ड्यात छायाला पुरून टाकले”, अशी माहिती ताब्यात घेतलेल्या मजुरांनी पोलिसांना दिली.
२४ डिसेंबर २०२० रोजी छाया बेपत्ता झाली होती. सर्वांना असे वाटले की, संतोष आणि छाया लग्न करण्यासाठी बेपत्ता झाले आहेत. परंतु, छायाने बरेच दिवस माहेरच्या लोकांशी संपर्क केला नाही म्हणून घरातील लोकांना शंका आली. ते पोलिसांकडे गेले. पोलिसांनी संतोषच्या बंद असलेल्या घराचे लाॅक तोडून झडती घेतली. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. शेवटी छायाच्या घरातील लोकांनी राजकीय लोकांकडून दबाव टाकून घटनेची व्यवस्थित चौकशी आणि तपास करण्यास सांगितले. तेव्हा दुसऱ्या वेळी संतोषच्या घरात खड्डा खोदला आणि ४ फुटाच्या खड्ड्यात छायाचा मृतहेत मिळाला.