पातूर (सुनिल गाडगे)– पातूर शहरातील द प्रोफेशनल करिअर अकॅडमी यांच्या वतीने बेरोजगार तसेच आर्मी, पोलीस भरती ची तयारी करत असलेल्या युवक, युवतींसाठी लेखी सराव व मैदानी भरती पूर्व सात दिवसीय प्रशिक्षणचे आयोजन संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
पातूर शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी यांनी पातूर शहरात प्रथमच होतकरु मुलां मुलींना देशाची सेवा करण्याचा मान मिळावा या उद्देशाने सात दिवसीय लेखी व मैदानी पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण चे आयोजन केले असून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी वयोमर्यादा 16 ते 28 असून सदर लेखी सराव मार्गदर्शन द प्रोफेशनल अकॅडमी येथे घेतल्या जाईल. तर मैदानी प्रशिक्षण तुळसाबाई कावल विद्यालय पातूर येथे 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी 5 ते 6 दरम्यान घेण्यात येईल. सदर सहभागी विध्यार्थ्यांना टी शर्ट, व प्रमाणपत्र देण्यात येईल.या प्रशिक्षण करिता विशेष पोलीस भरती मार्गदर्शक म्हणून निलेश गाडगे तर आर्मी सैन्य भरती विशेष मार्गदर्शक सुरज गवई असतील. तरी इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचे नाव नोंदणी करून लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांनी केले.