अकोला- जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेच्या अडीअडचणी निवारण करण्याकरीता पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाव्दारे डिजीटल राहुटी अभियान राबविण्यात येणार आहे. राहुटी अभियान यशस्वी होण्याकरीता जिल्हा व तालुकास्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी पार पाडण्याकरीता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी समिती गठीत केली आहे.
जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांची नेमणुक करण्यात आली असून त्यांच्याकडे जिल्ह्यांच्या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या डिजीटल राहूटी अभियानाचे नियोजन करणे व डिजीटल राहूटी अभियान 100 टक्के यशस्वी करण्याकरीता आवश्यक ती कामे करणे ही जबाबदारी देण्यात आली आहे. तांत्रीक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले यांनी डिजीटल राहूटी अभियान यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी लागणारे तांत्रीक बळ, त्याचप्रमाणे जेथे-जेथे डिजीटल राहूटी कार्यक्रम राबविण्यात येत आहे तेथे उपस्थित राहून तांत्रीक अडचण जाणार नाही. त्याबाबत संपुर्ण नियोजन करणे. तसेच सहायक तांत्रिक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमोदसिंह ठाकुर, विशाल धोटे व निलेश सवडतकर यांनी तांत्रीक अधिकारी यांचे संपर्कात राहून डिजीटल राहूटी अभियानास तांत्रीक दृष्ट्या अडचण निर्माण होणार नाही त्याबाबत आवश्यक सर्व जबाबदारी पार पाडावी. उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या उपविभागात राबविण्यात येणाऱ्या डिजीटल राहूटी अभियानाचे नियोजन करणे व डिजीटल राहूटी अभियान 100 टक्के यशस्वी होईल याकरीता आवश्यकती ते सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे जबाबदारी पार पाडावी.
तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसिलदार यांची नेमणूक करण्यात आली असून त्याच्याकडे तालुकास्तरावर राबविण्यात येणाऱ्या डिजीटल राहूटी अभियानाचे नियोजन करणे व डिजीटल राहूटी अभियान 100 टक्के यशस्वी होईल याबाबत आवश्यक ती सर्व कामे करण्याबाबतचे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच तांत्रीक अधिकारी नवीन कावल यांना बाळापूर व पातूर तालुका, मोमेन दुऱ्हानी यांनी अकोट व तेल्हारा तालुका तर सुरज खरडे यांनी मुर्तिजापूर व बार्शीटाकळी या तालुक्यात होणाऱ्या डिजीटल राहूटी करिता आवश्यक ते सर्व तांत्रीकबळ व डिजीटल राहूटी कार्यक्रमास तांत्रीक अडचण निर्माण होणार नाही याबाबत सर्व ती कामे पार पाडावी असे पत्रकाव्दार कळविण्यात आले आहे.